
मुंबई | 11 फेब्रुवारी 2024 : देशात सध्या तपास यंत्रणा सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. विरोधी पक्षातील नेत्यांची कसून चौकशी केली जाते. यावर बोलताना काँग्रेसचे राज्यसभेचे ज्येष्ठ खासदार कुमार केतकर यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. भाजप खासदारांसोबत काय बोलणं होतं, यावर त्यांनी भाष्य केलं. आम्हाला भाजपचे खासदार खासगीत सांगतात की, तुम्ही काय सांगता आमच्यावर देखील ईडी ची वॉच आहे. आम्ही काय त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. तुम्ही विरोधकांनी आवाज वाढवा. असंतोष केवळ लोकांमध्ये नाही. तर त्यांच्यामध्ये देखील आहे. तर याचा केव्हाही उद्रेक होईल त्यांना हे परवडणार नसेल, असं कुमार केतकर म्हणाले.
सुरत महाराजांनी लुटली. मोदी अमित शाहांना महाराष्ट्रावर सूड उगवायचा आहे. म्हणून अनेक उद्योग गुजरातला गेले. पण तिकडे गेलेलं सर्व ओसाड पडलेलं आहे. मला माहिती नाही कितीजण गुजरातला गेलात की नाही पण मुंबईत जसे कामगार असतात. तिकडे तसे निर्माण होत नाहीत. जशा सवलती मुंबई आणि महाराष्ट्रात लोकांना मिळतात तशा कुठेही मिळत नाही, असं म्हणत कुमार केतकर यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली.
73-74 साली जेव्हा आपली अर्थव्यवस्था बिकट होती. तेव्हा जनतेला सुकडी खायला मिळत होती. अनेकांनी सुकडी खाल्ली. तेव्हा अनेक मोर्चे मंत्रालयावर मोर्चे काढले जायचे. ते मोर्चे साखर आणि रवा आम्हाला सरकारने द्या यासाठी ते मोर्चे निघायचे. मराठी लोकांचा कसा अपमान केला जातो. ते मी संजय राऊत आणि अरविंद सावंत दिल्लीत पाहतोय. आता जी लाचारी सुरु आहे. तशी लाचारी कधीही कोणी पाहिली नाही. त्यामुळे लोकाधिकार समितीने पुढाकार घेणे गरजेचं आहे. सुरतला छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटली. तर सुरतला आणखी काही घेऊन जाता येईल का असे विचार त्यांचे सुरु आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर कुमार केतकर यांनी टीका केली आहे.
मी अनेकवेळा महाराष्ट्रात आंदोलन कव्हर करत होतो. पत्रकार म्हणून प्रश्नाची जाणीव आमच्या कचेरीतून झाली होती. अनेक वेळा माझे सहकारी म्हणायचे की तू आंदोलनात कव्हर करायला जाणं योग्य राहणार नाही. कारण तू मराठी आहेस माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोण वेगळा होता. पण मी जायचो. शिवसेना हे एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीच कार्य केलं. हुतात्मा चौकात मशाल असलेला प्रतिकृती आहे आता शिवसेनेच्या हातात मशाल आहे, असंही केतकर म्हणाले.