AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water: मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला! 4 दिवसांत तिसरा तलावही ओव्हरफ्लो, एप्रिलपर्यंत पुरेल इतकं पाणी जमा

Mumbai lake water level News : पुढचे नऊ महिने मुंबईकरांना पाण्याचं नो टेन्शन

Mumbai Water: मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला! 4 दिवसांत तिसरा तलावही ओव्हरफ्लो, एप्रिलपर्यंत पुरेल इतकं पाणी जमा
मुंबईच्या तलावांतील पाणीसाठा Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 17, 2022 | 8:29 AM
Share

मुंबई : मुंबईकरांना (Mumbai News) दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतील तलावं तुडुंब भरली आहे. अवघ्या चार दिवसांत (Mumbai Lake News) मुंबईला पाणी पुरवठा करणारं चौथं तलावही तुडुंब भरुन वाहू लगालंय. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या एप्रिल महिन्यापर्यंत तरी मिटला आहे. मुंबईला पाणी (Mumbai Lake Water Level) पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात गेल्या दोन आठवड्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईतील तलावांची पाणी पातळी कमालीची वाढली असून मुंबईत आता एप्रिलपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलावही तुडुंब भरलाय. सातही तलावांमध्ये मिळून आता 11,38,096 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा जमा झालाय. मुंबई दर दिवशी लागणाऱ्या पाणीसाठ्याचा विचार करता, आताचा पाणीसाठा हा पुढच्या एप्रिल महिन्यापर्यंत पुरेल, इतका आहे, असं सांगितलं जातंय. पुढचे नऊ महिने तरी मुंबईला आता पाण्याची चिंता सतावणार नाही, असं पाणीसाठ्याच्या आकरेवारीवरुन सध्यातरी स्पष्ट झालंय.

सातपैकी तीन तलावं ओव्हरफ्लो

मुंभईला अप्पर वैतरण, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी तीन तलावं सध्या ओव्हरफ्लो झाली आहेत. जून महिन्याच्या अखेरीस मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे 27 जूनपासून 10 टक्के पाणी कपात करण्यात आलेली. अखेर जुलैच्या सुरुवातीपासून पावसानं जोरदार कमबॅक केल्यानं मुंबईतील तलावं तुडुंब भरली आहेत.

मुंबईच्या तलावात 25 टक्के पाणीसाठा झाल्यानंतर पाणीकपात मागे घेण्यात आली होती. दरम्यान, सध्याच्या घडीला कोणत्या तलावात किती टक्के पाणी साठा आहे, त्यावर एक नजर टाकुया…

मुंबईच्या तलावांतील पाणीसाठा

  • अप्पर वैतरणा- 1,50,699 दशलक्ष लिटर
  • मोडक सागर- 1,28,925 दशलक्ष लिटर
  • तानसा 1,43,887 दशलक्ष लिटर
  • मध्य वैतरणा 1,57,818 दशलक्ष लिटर
  • भातसा 5,29,494 दशलक्ष लिटर
  • विहार- 18,313 दशलक्ष लिटर
  • तुळशी – 7961 दशलक्ष लिटर
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.