मुंबईकरांनो तुमच्यासाठी सर्व यंत्रणा तयार, पण… : किशोरी पेडणेकर

| Updated on: Mar 27, 2021 | 2:52 PM

विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, असा सूचनाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्या. (Kishori Pednekar On Corona)

मुंबईकरांनो तुमच्यासाठी सर्व यंत्रणा तयार, पण... : किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर, महापौर
Follow us on

मुंबई : मुंबईकरांनो तुम्ही स्वत:ला सावरा, बाकी सर्व यंत्रणा तुमच्यासाठी तयार ठेवली आहे. पण तुम्ही स्वत: सांभाळा. जेणेकरुन तुम्ही कोरोनाबाधित होणार नाही. याची काळजी घ्या, असे आवाहन  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. कोरोनाचे हॉट्स्पॉट ठरलेल्या मुंबईत बाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उद्यापासून नाईट कर्फ्यू लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, असा सूचनाही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्या. (Mumbai Mayor Kishori Pednekar On Corona Patient)

मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबईकरांना अनेक सूचना केल्या. मुंबईकरांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहे. त्या सर्वांना वर्क फॉर्म होमच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जर एका बिल्डींगमध्ये पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर ती सोसायटी सील केली जाणार आहे, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

तर ती संपूर्ण सोसायटी सील केली जाणार

अनेक मोठमोठ्या सोसायटीत कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. अनेक जण कोरोना चाचणीसाठी तयार होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. यामुळे मनपाने कठोर निर्णय घेतले आहेत. जर एखाद्या बिल्डींगमध्ये पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर ती संपूर्ण सोसायटी सील केली जाणार आहे. तसेच अनेक हायप्रोफाईल सोसायटीत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

वर्क फॉर्म होम करण्यावर भर द्या

मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. मात्र तरीही वारंवार अनेक जण बाहेर पडत आहे. वर्क फॉर्म होमच्या सूचना दिल्या आहेत. जास्ती जास्त लोकांनी वर्क फॉर्म होम करण्यावर भर द्यावा. मुंबईतील गार्डनमध्ये मार्शल फिरत आहेत. पब आणि समुद्र किनारे, बार, हाॅटेल या ठिकाणी लोकांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईत लसीकरणाचा टक्का वाढत नाही. झोपडपट्टी असलेल्या भागातून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केंद्राकडून डोअर टू डोअर लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. यासाठी कोरोना लसीचा साठाही केंद्राकडून मागवला जाणार आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अॅपची निर्मिती

राज्य सरकारने दहावी-बारावी परीक्षेचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच तयार करण्यात आला आहे. याची उत्तर तुम्हाला एका विशिष्ट अॅपवर मिळणार आहे. या अॅपवर तुम्हाला पुस्तक वाचता येतील, नोट्स मिळतील. याचा मुलांना फायदा होईल. त्यामुळे शिक्षणाची विस्कटलेली घडी पूर्ववत होण्यास मदत होईल.

मुंबई मेयर हा कूपन कोड टाकल्यानंतर या अॅपवर तुम्हाला विनामूल्य नोट्स मिळणार आहे. यात महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या नोट्स उपलब्ध आहेत. या नोट्स मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषेत उपलब्ध आहेत.  (Mumbai Mayor Kishori Pednekar On Corona Patient)

संबंधित बातम्या : 

ड्रीम्स मॉल आगीचा चौकशी अहवाल 15 दिवसात सादर करा; पालिका आयुक्तांचे आदेश

Holi 2021 Guidelines : राज्यात होळी, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, तुमच्या शहरातील नियम काय?