AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ड्रीम्स मॉल आगीचा चौकशी अहवाल 15 दिवसात सादर करा; पालिका आयुक्तांचे आदेश

भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये काल शुक्रवारी लागलेल्या आगीची महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी गंभीर दखल घेतली आहे. (BMC Directs Inquiry Into Accident, Wants Lapses In Compliance Probed)

ड्रीम्स मॉल आगीचा चौकशी अहवाल 15 दिवसात सादर करा; पालिका आयुक्तांचे आदेश
Bhandup Fire
| Updated on: Mar 27, 2021 | 2:48 PM
Share

मुंबई: भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये काल शुक्रवारी लागलेल्या आगीची महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी गंभीर दखल घेतली आहे. इक्बाल सिंग चहल यांनी या घटनेची चौकशी करून येत्या 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. (BMC Directs Inquiry Into Accident, Wants Lapses In Compliance Probed)

पालिका आयुक्त इक्बास सिंग चहल यांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांना या चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेची तसेच त्यातील आगीच्या कारणांबाबत सर्वंकष चौकशी करण्याचे आणि त्याचा अहवाल पुढील पंधरा दिवसात सादर करण्यात यावा असं या आदेशात म्हटलं आहे.

या मुद्द्यांवर होणार चौकशी

>> ड्रीम्स मॉल घटनेतील आगीचे नेमके कारण काय, त्याबाबत प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्यासोबत सल्लामसलत करून कारणांची स्पष्टता करणे.

>> मॉल तसेच त्यातील सनराईज रुग्णालयाला आवश्यक त्या सर्व परवानगी/अनुज्ञप्ती (licence) देण्यात आल्या होत्या का, त्याची पडताळणी करून, दिलेल्या नसल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणे.

>> अग्निसुरक्षा पालनाबाबतच्या उपाययोजना करण्यात मॉलचे मालक/व्यवस्थापन तसेच रुग्णालयाचे मालक/व्यवस्थापन यांच्याकडून काही त्रुटी राहिल्या होत्या का, ते शोधून काढणे. अग्निशमन कार्यात काही त्रुटी होत्या का, त्याची कारणे शोधून काढणे. या घटनेच्या अनुषंगाने, इतर काही संदर्भित मुद्दे असल्यास ते आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये म्हणून योग्य त्या शिफारशी करणे.

दहा जणांचा मृत्यू

भांडूप येथील ड्रिम्स मॉलला काल आग लागली होती. या आगीत दहा जणांचा मृत्यू झाला होता. मॉलमध्ये कोविड रुग्णालयही होते. त्यामुळे या आगीत रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूही झाला होता. आगीत संपूर्ण मॉल जळून खाक झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश देतानाच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्याचं जाहीर केलं होतं.

10 लाखांची मदत करा

दरम्यान, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही घटना गंभीर असल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबीयांना 5 नव्हे, तर 10 लाखांची मदत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच परवानगी नसतानाही मॉल उभारणे, त्यात कोव्हिडसारखे हॉस्पिटल चालवणे ही घटना गंभीर आहे. याची सर्वांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही केली आहे. याशिवाय ओसीशिवाय इमारत किंवा रुग्णालय सुरू करू नये, त्याबाबतचे निर्देश पालिका आयुक्तांनी संबंधित खात्यांना देण्याची मागणीही त्यांनी केली होती. (BMC Directs Inquiry Into Accident, Wants Lapses In Compliance Probed)

संबंधित बातम्या:

Fire in Mumbai : दुकानाला आग लागलेली पाहून नाना पटोलेंनी गाडी थांबवली, अन्…

भांडूप मॉलमधील आग निष्काळजीपणातून, हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार: हेमंत नगराळे

मुंबईत प्रभादेवीत गोदामाला भीषण आग, दोन दिवसात पाच ठिकाणी अग्नितांडव

मुंबईत प्रभादेवीत गोदामाला भीषण आग, दोन दिवसात पाच ठिकाणी अग्नितांडव

(BMC Directs Inquiry Into Accident, Wants Lapses In Compliance Probed)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.