Fire in Mumbai : दुकानाला आग लागलेली पाहून नाना पटोलेंनी गाडी थांबवली, अन्…

काल रात्रीच्या सुमारास परेलमध्येही आगीची घटना पुढे आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची संवेदनशीलता पुढे आली आहे (Nana Patole Stopped The Vehicle Seeing The Shop On Fire At Parel).

Fire in Mumbai : दुकानाला आग लागलेली पाहून नाना पटोलेंनी गाडी थांबवली, अन्...
Nana Patole

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसात तब्बल सहा ते सात ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाला आहे (Nana Patole Stopped The Vehicle). काल, मुंबईतील भांडूप मॉलला भीषण आग लागली. तब्बल 11 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आली. त्यातच काल रात्रीच्या सुमारास परेलमध्येही आगीची घटना पुढे आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची संवेदनशीलता पुढे आली आहे (Nana Patole Stopped The Vehicle Seeing The Shop On Fire At Parel).

नाना पटोलेंची संवेदनशीलता

काल शुक्रवारी (26 मार्च) रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी नाना पटोले हे भिवंडीवरुन परतत असताना त्यांची नजर परेल येथील आगीवर पडली. त्यांनी तात्काळ त्यांची ताफा तिथे थांबवला.

परेल येथे लंडन वाईन शॉप येथे ही आग लागली होती. ती आग पाहून नाना पटोले यांनी आपला ताफा थांबवला. त्यानंतर त्यांनी लगेच पोलीस आणि अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. तसेच, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान येतपर्यंत नाना पटोले तेथेच थांबले. त्यांची ही संवेदनशीलता पाहून तिथे उपस्थितीत नागरिकही आवाक झाले.

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील भीषण 11 तासांनी आटोक्यात, 10 जणांचा होरपळून मृत्यू

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग तब्बल 11 तासांनी आटोक्यात आली. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे.

मुंबईच्या महापौर घटनास्थळी

भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तसेच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

महापौरांकडून चौकशीचे आदेश

अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच, याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची पाहणी केली. ही पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जर यात दिरंगाई, दुर्लक्ष असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, अशी सूचना दिली आहे.

मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आगीत होरपळून ठार झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. या रुग्णालयात काही लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यांचाच या दुर्घटनेत अधिक मृत्यू झाला आहे. अशावेळी व्हेंटिलेटर बंद करणं किंवा त्याचा निर्णय घेणं कठिण असतं. मात्र, या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्वांच्या कुटुंबीयांकडे मी दिलगिरी व्यक्त करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Nana Patole Stopped The Vehicle Seeing The Shop On Fire At Parel

संबंधित बातम्या :

भांडूप मॉलमधील आग निष्काळजीपणातून, हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करणार: हेमंत नगराळे

मुंबईत प्रभादेवीत गोदामाला भीषण आग, दोन दिवसात पाच ठिकाणी अग्नितांडव

मुंबईत प्रभादेवीत गोदामाला भीषण आग, दोन दिवसात पाच ठिकाणी अग्नितांडव

Published On - 11:12 am, Sat, 27 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI