BMC जिंकण्याचा बाप्पाकडे आशीर्वाद मागितला का?, महापौर पेडणेकर म्हणतात, ‘ते आमच्या कामावर अवलंबून’

| Updated on: Sep 10, 2021 | 12:09 PM

राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीय. घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन होतंय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय.

BMC जिंकण्याचा बाप्पाकडे आशीर्वाद मागितला का?, महापौर पेडणेकर म्हणतात, ते आमच्या कामावर अवलंबून
किशोरी पेडणेकर, मुंबईच्या महापौर
Follow us on

मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीय. घरोघरी लाडक्या बाप्पांचं आगमन होतंय. सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रेटी, राजकारणी मंडळी देखील गणरायाच्या भक्तीमध्ये दंगून गेलेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरीही बाप्पांचं आगमन झालंय. यावेळी गणरायाचरणी मुंबई महापालिका जिंकण्याचा आशीर्वाद मागणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ती गोष्ट गणरायाकडे मागण्याची नाहीय. आमच्या कामावर निवडणूक अवलंबून असेल, असं त्या म्हणाल्या.

BMC जिंकण्याचा बाप्पाकडे आशीर्वाद मागितला का?

“बीएमसी इलेक्शन हे काही बापाकडे मागण्यास सारखं नाहीय. आम्ही जे काही काल केलंय, त्याने जनता आम्हाला आशीर्वाद देईलंच, मग थोडंफार तुमच्या कर्माचा आणि नशिबाचा भाग असतो. मी एवढंच सांगेन सध्या कोरोनाकाळात लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊ, त्यांची सेवा करु”, असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.

“कोरोना काळ सुरु असल्याने धुमधडाक्यात उत्सव साजरा करण्यावर मनाई आहे. शासनाने घालून दिलेले नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा, असं मुंबईकरांना मी आवाहन करते, असं पेडणेकर म्हणाल्या. कोरोना काळात शिवसेनेकडून अनेक ठिकाणी आरोग्यसेवा सेवा सुरु आहे, जनहिताचे प्रकल्प सुरु आहेत. हे सर्व निर्विघ्न व्यवस्थित पार पडू दे”, असं त्या म्हणाल्या.

मुंबईकरांनो कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करा

“मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब वारंवार सांगत आहेत की आपण सण नक्की साजरा करा पण तो साजरा करत असताना गर्दी करू नका उगाच एकमेकांच्या घरी जाणं करू नका. कारण आता दोन डोस घेतलेले पण थोडेफार बाधित होताना दिसत आहे. जिथे रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे तिथे तर काळजी घेतलीच पाहिजे. म्हणून मी म्हटलं ‘माझं घर, माझा बाप्पा’ साजरा करण्यावर लोकांनी भर द्यावा”, असंही त्या म्हणाल्या.

राज्यभरात गणेशोत्सवाची धूम, घरोघरी बाप्पांचं आगमन

ना ढोलताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं. राज्यभर रस्त्यांवरून गणेश मूर्त्या घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते. मात्र, रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम होता. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही राज्य सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे.

हे ही वाचा :

Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह

Ganesh Chaturthi 2021 Live Updates | लाडक्या बाप्पाचं आगमन, राज्यभरात गणेशोत्सवाची धूम