Ganesh Chaturthi 2021 Live Updates | औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या गणपतीची स्थापना सुरू

| Updated on: Sep 11, 2021 | 12:00 AM

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय.  आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होईल.

Ganesh Chaturthi 2021 Live Updates | औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या गणपतीची स्थापना सुरू
Lalbaugcha raja

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सवाला आजपासून सुरुवात होतेय.  आजपासून लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर संपूर्ण राज्यात धूम पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गणेशाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी आज आगमन होईल. आज भाविक आपल्या प्रिय गणेशाला घरी आणतील आणि 10 दिवस त्यांची मनोभावे पूजा आणि सेवा करतील. या दिवसांमध्ये गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणेश भक्त घरात, मंदिरांमध्ये आणि विविध मंडळांमध्ये गणेशाची पूजा करतात. त्यांना शेंदूर, दुर्वा, नैवेद्य अर्पण करतात. त्यांची आरती गातात.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Sep 2021 08:15 PM (IST)

    औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या गणपतीची स्थापना सुरू

    औरंगाबाद :-

    औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या गणपतीची स्थापना सुरू

    गजानन महाराज मंदिर चौकातील नवीन औरंगाबाद गणेश मंडळाच्या मूर्तीची स्थापना सुरू

    स्थापना करण्यासाठी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि एमआयएम खासदार इम्तियाज जलील उपस्थित

  • 10 Sep 2021 08:12 PM (IST)

    नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदी, पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांचे आदेश

    – नाशिक शहरात 15 दिवस जमावबंदी

    – पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांचे आदेश

    – गणेश मंडळात प्रत्यक्षपणे दर्शन घेण्यास तसेच मिरवणूकीला बंदी

    – 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊन जमाव करण्यास बंदी

  • 10 Sep 2021 03:36 PM (IST)

    कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नालासोपाऱ्यातील धणीवगावच्या तरुणांचा आदर्श उपक्रम, सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून घरगुती गणपतीची मूर्तीस्थापणा 

    नालासोपारा : कोरोना महामारीच्या सावट खालीच यंदाचाही गणेशोत्सव साजरा होत आहे. या गणेशोत्सव मध्ये गावात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नालासोपाऱ्यातील धणीवगाव च्या युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक गाव, एक घर, एक गणपती ही संकल्पना राबवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. गावातील 5 दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव रद्द करून, माजी नगरसेवक पंकज पाटील यांच्या घरात 5 दिवसाच्या घरगुती गणरायाची मूर्तीस्थापणा केली आहे. पाटील कुटुंबीय दरवर्षी दीड दिवसाचा घरगुती गणपती बसवत होते. यंदाचे त्यांचे 25 वे रौप्य महोत्सव वर्षे आहे आणि याच दिवसाचे औचित्य साधून, गावक-यांची एकीचे स्वागत करत, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी आपल्या घरात 5 दिवसाच्या गणरायाची स्थापना केली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून, बाप्पाची भक्तिभावाने धणीवचे गावकरी पुढचे 5 दिवस सेवा करणार आहेत.

  • 10 Sep 2021 01:00 PM (IST)

    लालबागच्या राजाचं मुखदर्शन

    लालबागच्या राजाचं मुखदर्शन

    दोन तासांनंतर प्रतिष्ठापनेला सुरुवात

    लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला बंदी

    फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे

    नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, अशा शब्दात मुंबई पेलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील ठणकावलं आहे

  • 10 Sep 2021 11:39 AM (IST)

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी सुद्धा आज बाप्पाचे आगमन झाले

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी सुद्धा आज बाप्पाचे आगमन झाले

    दरवर्षी प्रमाणे आज सहकुटुंब टोपे कुटुंबाने बाप्पाची प्रतिष्ठापना केली

    यावेळीत्यांचे दोन्ही पुत्र देखील सोबत होते

  • 10 Sep 2021 11:37 AM (IST)

    खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तळगाव इथं गणरायाचं आगमन

    सिंधुदूर्ग -

    खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तळगाव इथं गणरायाचं आगमन

    खासदार विनायक राऊत यांनी स्वतः केली गणपतीची प्राणप्रतिष्ठापना

    देशाचे पंतप्रधान म्हणुन नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिर्घ आयुष्यासाठी गणरायाकडे साकडे

    कोरोनाच्या संकटापासून जगाची सुटका व्हावी अशी हि केली श्रीचरणी प्रार्थना

    नेहमीच तुटून पडणाऱ्या विरोधकांना देखिल चांगली बुद्धीची गणरायाकडे मागणी

  • 10 Sep 2021 11:37 AM (IST)

    माजी मंत्री आमदार संजय राठोड याच्या घरी विधीवत गणेशाचे आगमन

    यवतमाळ - माजी मंत्री आमदार संजय राठोड याच्या घरी विधीवत गणेशाचे आगमन

    गणरायाच्या स्वागतात सर्व कुटूंब हजर

    गेल्या 15 वर्षा पासून घरी गणपती बाप्पा चा उत्सव साजरा केला जातोय

  • 10 Sep 2021 11:36 AM (IST)

    काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईतील निवासस्थानी केली गणेश प्रतिष्ठापना

    काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईतील निवासस्थानी केली गणेश प्रतिष्ठापना

    काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे

    पत्नी उज्ज्वला शिंदे, यांच्या उपस्थितीत केली गणेश पूजा

  • 10 Sep 2021 10:46 AM (IST)

    मानाचा पाचवा गणपती केसरीवाड्यातील मूर्ती दाखल

    पुणे

    मानाचा पाचवा गणपती केसरीवाड्यातील मूर्ती दाखल

    जयंत टिळक आणि रोहित टिळक यांच्याकडून केली जाणार विधीवत प्राणप्रतिष्ठापना

    केसरीवाड्यात गणपती उत्सवाचा उत्साह...

  • 10 Sep 2021 10:45 AM (IST)

    चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीची प्रतिष्ठापना

    औरंगाबाद -

    औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीची प्रतिष्ठापना सुरू

    शिवसेनानेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना सुरू

    11 दिवस चालतो संस्थान गणपती महोत्सव

    औरंगाबादचे ग्रामदैवत म्हणून संस्थान गणपतीची ओळख

  • 10 Sep 2021 10:13 AM (IST)

    पुण्यात घरोघरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना

    पुणे

    पुण्यात घरोघरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना,

    गणपती उत्सवाचा उत्साह सगळीकडे

    पारंपरिक पद्धतीने गणरायाच आगमन,

  • 10 Sep 2021 10:12 AM (IST)

    नागपूरच्या फुल बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी

    नागपूरच्या फुल बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी

    गणेश चतुर्थी च्या निमित्ताने फुल खरेदी साठी मोठी गर्दी

    फुलांचे भाव सर्वसाधारण असल्याने भक्तांना दिलासा

    फुलांची मोठ्या प्रमाणात वाफहली आवक

    सगळ्याच प्रजाती ची फुल बाजारात उपलब्ध

    गणेश चतुर्थी च्या निमित्ताने फुल खरेदी साठी गर्दी

    मात्र कोरोना चा पडला नागरिकांना विसर

  • 10 Sep 2021 10:11 AM (IST)

    शाडू मातीच्या गणेश मूर्ती घेण्यावर नाशिककरांचा भर

    - शाडू मातीच्या गणेश मूर्ती घेण्यावर नाशिककरांचा भर

    - प्रशासनाचे निर्बंध,आणि प्रदूषणाचा धोका लक्षात घेता आपल्या बाप्पाच घरातच विसर्जन करता याव यासाठी नाशिककरांची शाडू गणेश मूर्तीला मागणी

    - बाजारपेठेत ही अधिक स्टॉल शाडू माती गणेश मूर्तीचे

  • 10 Sep 2021 10:10 AM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये लाडक्या गणेशाचे स्वागत मोठ्या उत्साहात

    पिंपरी चिंचवड

    - पिंपरी चिंचवडमध्ये लाडक्या गणेशाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जात आहे

    - सकाळपासून गणेश भक्त लाडक्या गणेशाला घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी करत आहेत..

  • 10 Sep 2021 10:10 AM (IST)

    माजी कृषिराज्य मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या घरी विघ्नहर्त्याचं आगमन

    सांगली -

    माजी कृषिराज्य मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूरच्या घरी विघ्नहर्ता गणपती बाप्पा चे आगमन

  • 10 Sep 2021 08:56 AM (IST)

    लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज

    कोल्हापूर

    लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी करवीर नगरी सज्ज

    बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तची कुंभार गल्ली मध्ये रेलचेल

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे निर्बंध कडक

    त्यामुळे यावर्षी कुंभार गल्लीत तुलनेने कमी गर्दी

    अनेक भक्तांनी गणेशमूर्ती आधी दोन दिवस घरी घेऊन जाण केलंय पसंत

  • 10 Sep 2021 08:56 AM (IST)

    नागपुरात घरगुती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापणेला सुरुवात

    - नागपुरात घरगुती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापणेला सुरुवात

    - भाजप आमदार बंटी भांगडीया यांच्या घरी बप्पाची प्राणप्रतिष्ठापणा

  • 10 Sep 2021 08:55 AM (IST)

    बीड गणेशोत्सवासाठी पोलिसांची नवीन नियमावली जारी

    बीड गणेशोत्सवासाठी पोलिसांची नवीन नियमावली जारी

    सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट तर घरगुती मूर्तीला 2 फुटाची मर्यादा

    तिसऱ्या लाटेच्या भीतीने जिल्हा प्रशासन सतर्क

    विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही

    गणेश मंडळांनी नियम डावलल्यास कारवाईचा ईशारा

  • 10 Sep 2021 08:45 AM (IST)

    नागपुरात बाप्पाच्या ॲानलाईन दर्शनावर पोलीसांचा असणार वॉच

    नागपूरात बाप्पाच्या ॲानलाईन दर्शनावर पोलीसांचा असणार वॅाच

    - शहरभरात ४००० पोलीस असणार बंदोबस्तासाठी तैनात

    - नागपूर शहरात ९०० पेक्षा जास्त सार्वजनिक गशेणमंडळ

    - नागपूरात गणेशोत्सवादरम्यान असणार चोख पोलीस बंदोबस्त

    - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक दक्ष

    - नागपूरातील चितारओळीत सध्या चोख पोलीस बंदोबस्त

  • 10 Sep 2021 08:25 AM (IST)

    गडकरी vs पटोले 'सामना', गडकरींचा उच्च न्यायालयात अर्ज

    ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवडणूक याचीकेतील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर’

    - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उच्च न्यायालयात अर्ज

    - गडकरींच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केल्याने नाना पटोलेंवर पलटवार

    - ‘नाना पटोले यांच्या निवडणूक याचीकेतील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर’

    - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखल केला अर्ज

    - आधी नाना पटोले यांनी दाखल केली होती निवडणूक याचिका

  • 10 Sep 2021 08:20 AM (IST)

    कोकणात गणपती उत्साहाचा आनंद शिगेला, गणपती घरी नेतानाची ड्रोन दृश्यं

  • 10 Sep 2021 08:19 AM (IST)

    गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

  • 10 Sep 2021 08:18 AM (IST)

    दादर फुलमार्केटमध्ये लोकांची तुफान गर्दी, नियोजनासाठी ना पोलिस ना पालिका कर्मचारी

  • 10 Sep 2021 08:15 AM (IST)

    आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे मंगलमय वातावरणात स्वागत करण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज

    पुणे :

    आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे मंगलमय वातावरणात स्वागत करण्यासाठी अवघी पुण्यनगरी सज्ज

    कोरोनाचे नियम पाळत; पण उत्साह कमी न होऊ देता पुण्याची गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा जपण्याचा पुणेकरांचा प्रयत्न

    दगडूशेठ गणपतीबाहेर दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी

  • 10 Sep 2021 08:14 AM (IST)

    नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात गणेशोत्सवाला सुरुवात

    - नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात गणेशोत्सवाला सुरुवात

    - मंदिर बंद असल्याने गणेशभक्तांची मुख्यप्रवेशद्वाराजवळ गर्दी

    - मोजक्याच पुजाऱ्याच्या उपस्थितीत झाली बाप्पाची पुजा

    - गणेश टेकडी मंदिरात विविध राज्यातील गणेशभक्त येतात दर्शनाला

  • 10 Sep 2021 08:14 AM (IST)

    सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

    वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि मिलिंद राहुरकर हे पौरोहित्य करणार आहेत

    प्राणप्रतिष्ठापना सोहळा ‘श्रीं’चे दर्शन आणि ऋषिपंचमीनिमित्त होणारा अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने घेतला जाणार आहे

    भाविकांना दर्शन ऑनलाइन घेता येईल आकर्षक अशी सजावट मंदिरा बाहेर करण्यात आली आहे

  • 10 Sep 2021 08:12 AM (IST)

    बाप्पांची मूर्ती आणि मुशक लाही लावला मास्क, गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती

    - बाप्पांची मूर्ती आणि मुशक लाही लावला मास्क

    - गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती

    - नागपूरच्या चितारओळीत बाप्पांची मुर्ती घरी नेण्यासाठी लगबग सुरु

    - गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह

    - कोरोनाचे नियम पाळत साजरा होतेय गनेशोत्सव

    - पर्यावरण पुरक बाप्पांच्या मुर्ती घेण्याकडे गणेशभक्तांचा कौल

  • 10 Sep 2021 08:11 AM (IST)

    नाशिकच्या प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात महापूजेला सुरवात

    - नाशिकच्या प्रसिद्ध चांदीच्या गणपती मंदिरात महापूजेला सुरवात..

    - मंदिरात आकर्षक रोषणाई,गणपती बाप्पा समोर आकर्षक सजावट..

    - भाविकांना प्रवेश द्वारावरूनच दर्शन घेण्यास परवानगी..

    - सकाळपासुन भाविक करतायत मंदिर परिसरात गर्दी

  • 10 Sep 2021 08:10 AM (IST)

    मुंबईतील अंधेरी मरोळ इथल्या शिवगर्जना तरुण मित्र मंडळाचा उपक्रम, कोव्हिड वॅक्सिनवर गणेशाची मुर्ती विराजमान

    - मुंबईतील अंधेरी मरोळ इथल्या शिवगर्जना तरुण मित्र मंडळाचा उपक्रम

    - मरोळचा मोरया मंडळाचे यंदा 54 वे वर्ष

    - यंदा मंडळाने कोविड मुक्त भारत या विषयावर लसीकरण बाबत होणारे फायदे यावर तयार केला देखावा

    - कोव्हिड वॅक्सिनवर गणेशाची मुर्ती विराजमान

    - सोशल डिस्टेंसिंग आणि फ्रंट लाईन वर्कर्सचा कामाला सॅल्युट करणारा देखावा

Published On - Sep 10,2021 8:06 AM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.