मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा

| Updated on: Aug 19, 2020 | 12:27 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव ओव्हर फ्लो झाला (Mumbai Modak Sagar lake Overflow)  आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तिसरे तलाव ओव्हरफ्लो, धरणांमध्ये 82.95 टक्के पाणीसाठा
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात वाढ होत आहे. मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. आज (18 ऑगस्ट) रात्री 9.24 च्या सुमारास हे तलाव ओसंडून वाहू लागले. (Mumbai Modak Sagar lake Overflow)

गेल्या वर्षी हा तलाव 26 जुलै 2019 ला भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी 2018 ला 15 जुलैला हे तलाव ओव्हर फ्लो झाले होते. मात्र यंदा जून, जुलै या दोन्ही महिन्यात पावसाने फार कमी हजेरी लावली. त्यामुळे अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे.

दरम्यान सुदैवाने ऑगस्ट महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईतील सात तलावांपैकी तीन तलाव भरले आहेत. नुकतंच मुसळधार पावसामुळे मोडक सागर धरण भरले आहे. याआधी तुळशी आणि विहार तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट लवकरच टळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 82.95 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सकाळी 6 वा. माहितीनुसार, मुंबईकडे 1200642 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. गेल्यावर्षी यावेळी 94.20 टक्के पाणीसाठा होता. सध्याचा पाणीसाठा पुढचे 315 दिवस म्हणजे पुढचे 10 महिने पुरेल, अशी माहिती पालिकेने दिली आहे. (Mumbai Modak Sagar lake Overflow)

संबंधित बातम्या : 

मुंबईकरांसाठी खूशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हरफ्लो

बारा दिवसात पाणीसाठा दुप्पट, मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतकं पाणी