AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांवर डेंग्यू, मलेरियासह गॅस्ट्रोचे संकट; रूग्णसंख्येत मोठी वाढ, प्रशासन अलर्टवर

Mumbai Monsoon Diseases : मुंबईत जूनच्या तुलनेत जुलै 2026 मध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या आजारांचा सामना करण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

मुंबईकरांवर डेंग्यू, मलेरियासह गॅस्ट्रोचे संकट; रूग्णसंख्येत मोठी वाढ, प्रशासन अलर्टवर
Mumbai monsoon diseasesImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 03, 2026 | 7:51 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राजधानी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळी आजारांचा धोकाही वाढला आहे. अशातच आता पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मुंबईत जूनच्या तुलनेत जुलै 2026 मध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. आता पालिकेकडून खबरदारीचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि H1N1 (स्वाइन फ्लू) या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

जून आणि जुलै महिन्यातील रुग्णसंख्या

  • मलेरिया – 655 वरून 1380
  • डेंग्यू – 266 वरून 466
  • चिकुनगुनिया – 7 वरून 7
  • लेप्टोस्पायरोसिस – 33 वरून 78
  • गॅस्ट्रो – 603 वरून 851
  • कोविड-19 – 27 वरून 58
  • H1N1 – 58 वरून 105

मलेरिया-डेंग्यूसाठी पालिकेची विशेष मोहीम

मलेरिया-डेंग्यू या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने विशेष मोहिम सुरू केली आहे. पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नियमित सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा नायनाट केला जात आहे. यासाठी शून्य डास प्रजनन मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात 6 लाख 59 हजार 316 घरांचे आणि 23 लाख 01 हजार 942 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. या काळात 75 हजार 650 रक्तनमुने संकलित करण्यात आले. तसेच 123 आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली होती. तर 51 हजार 216 नागरिकांना लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आले आहेत. मलेरिया नियंत्रणासाठी 54 हजार 605 उत्पत्तीस्थळांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 5 हजार 969 ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळली.

नागरिकांनी पाणी साचू देऊ नये

पालिकेने नागरिकांना पाणी साचू न देण्याचे आवाहन केले आहे. घरात, घराभोवती तसेच इमारतींच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. जुन्या टायर, पाण्याच्या टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनर यांसारख्या वस्तूंमध्ये पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होऊ शकते. दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक औषधांचा वापर करावा. ताप आल्यास जवळच्या पालिका दवाखान्यात किंवा रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

लेप्टोस्पायरोसिसपासून वाचण्यासाठी पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी

लेप्टोस्पायरोसिस या आजारापासून वाचण्यासाठी पालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चालू नये, मुसळधार पावसात उघड्या पायाने चालू नये आणि शक्य असल्यास गमबूट वापरावेत. साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे. कारण एफ-उत्तर, एम-पूर्व, टी, के-पूर्व आणि जी-उत्तर विभागात लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

गॅस्ट्रोचा धोक्यामुळे उघडे अन्न टाळण्याचे आवाहन

गॅस्ट्रोपासून बचावासाठी रस्त्यावरील किंवा उघडे अन्न खाणे टाळावे. जेवणापूर्वी हात साबणाने धुवावेत किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करावा. पाणी उकळून प्यावे. एल, एच-पश्चिम, के-पश्चिम, एन आणि एच-पूर्व विभागात गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे असे पालिकेने म्हटले आहे.

कोविड-19 आणि इन्फ्लुएंझापासूनही काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई महापालिकेने कोविड-19 आणि इन्फ्लुएंझापासूनही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पालिकेने म्हटले की, खोकताना शिष्टाचार पाळावा, साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवावेत. योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. ताप आल्यास स्वतःहून औषधे घेणे टाळून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. दरम्यान, पालिकेकडून 42 हजार 284 इमारतींच्या परिसरात आणि 5 लाख 95 हजार 92 झोपड्यांमध्ये धुम्रफवारणी करण्यात आली आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी