मुंबई महापालिका बजेट: शिक्षण समितीचं 2733 कोटीचं बजेट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:30 PM

मुंबई: मुंबई महापालिकेचं 2019 – 20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. मुंबईकरांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्हाड यांनी शिक्षण समितीचं बजेट सुपूर्द केलं. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचं 2733 कोटीचं बजेट जाहीर करण्यात आलं. शिक्षण समितीचं बजेट – मुंबई महापालिकेच्या शालेय […]

मुंबई महापालिका बजेट: शिक्षण समितीचं 2733 कोटीचं बजेट
Follow us on

मुंबई: मुंबई महापालिकेचं 2019 – 20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. मुंबईकरांना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्हाड यांनी शिक्षण समितीचं बजेट सुपूर्द केलं. मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचं 2733 कोटीचं बजेट जाहीर करण्यात आलं.

शिक्षण समितीचं बजेट
– मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास, अंदाजे 36, 473 विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास योजना
– पालिका शाळेत सीसीटीव्ही बसवणे प्रस्तावित, एकूण 6666 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी 24,30 कोटींची तरतूद
– ई लायब्ररीसाठी 1.30 कोटी
– डिजीटल क्लासरुमसाठी 8 कोटी
– मिनी सायन्स सेंटर 66 कोटी
-दिव्यांग विद्यांर्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, पहिली ते दहावी – 3 कोटींची तरतूद
– आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांच्या निर्मितीसाठी 2.60 कोटी
– भाषा कौशल्य समृद्ध होण्यासाठी भाषा प्रयोगशाळांची निर्मिती होणार–1.30 कोटी
– आधुनिक पद्धतीनं शिक्षण देणारी टिंकर लॅब – 1.42 कोटी (टिंकर लॅबमध्ये थ्रीडी डिझाईनींग, प्रिंटींग, इलेक्ट्रॉनिक रोबोट बनवणे, मोबाईल अॅप विकसित करणे यासारख्या गोष्टी शिकवल्या जातील)
– बालभवन- दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत कलाशिबीरं, व्यक्तीमत्व विकास – 12 लाख
– नाबेटद्वारे शाळांचे मूल्यमापन- नाबेट संस्थेद्वारे महापालिका शाळांची गुणवत्ता, दर्जा यांचं मूल्यमापन केलं जाणार, नाबेटच्या सूचनांची अंमलबजावणी शाळांमध्ये करण्यात येईल- 20 लाख
– समुपदेशन – विद्यार्थ्यांमधील वाढतं नैराश्य, ताणतणाव यांना तोंड देण्यासाठी समुपदेशक नेमणार – 1 कोटी
– लाभार्थी थेट अनुदान योजना- महापालिकेकडून शालेय साहित्यासाठी लागणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार
– विज्ञान कुतूहल भवन- भूगोल, खगोल, आरोग्य या विषयांशी संबंधित विज्ञान कुतूहल भवनाची निर्मिती –1.20 कोटी
– येत्या आर्थिक वर्षातही ज्या शैक्षणिक योजना सुरु राहतील, त्यासाठी केलेली वाढीव तरतूद
– शाळांमधील सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे- 24.30 कोटी
-ई-लायब्ररी- 1.30 कोटी
-डिजीटल क्लासरुम- प्राथमिक–5.33 कोटी
– माध्यमिक- 2.91 कोटी
-टॉय लायब्ररी– 7.38 कोटी
-मिनी सायन्स सेंटर्स- 66 लाख
-महापालिका शाळांची वेगळी ओळख विशिष्ट रंगांद्वारे – महापालिका शाळांना विशिष्ट ओळख
प्राप्त व्हावी, यासाठी तपकिरी-पिवळा या रंगाचा संगम असलेली रंगरंगोटी होणार- 201.73 कोटी
-दिव्यांग विद्यार्थी-पालक उपस्थिती भत्ता- 3.8 कोटी
-व्हर्च्युअल क्लासरुम– व्हिटीसीद्वारे तज्ञ शिक्षकांची व्याख्याने आयोजित– प्राथमिक– 10.44 कोटी
– माध्यमिक– 6.48 कोटी