सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? नवाब मलिक म्हणाले, अजितदादा किंगमेकर…

Nawab Malik on Sharad Pawar Eknath Shinde : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिकांच्या विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा होऊ लागली आहे. मलिक काय म्हणाले? वाचा सविस्तर...

सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? नवाब मलिक म्हणाले, अजितदादा किंगमेकर...
नवाब मलिक, नेते, अजित पवार गट
Image Credit source: ANI
| Updated on: Nov 05, 2024 | 1:34 PM

राज्यात विधानसभा निवडणूक होत असतानाच एका चर्चा जोर धरू लागली आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर माजी मंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नबाव मलिक यांनी भाष्य केलं आहे. शिंदे- पवार एकत्र येतील, ही चर्चाच आहे ना… या महाराष्ट्रामध्ये कुठला राजकारण कुठे चालतो आहे. कोण काँग्रेसची माणसं भाजपचे होत आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये येत आहेत. महाराष्ट्रामध्ये राजकारण अस्पष्ट होताच नाही. काटेंचा मुकाबला आहे. पण निकालानंतर काही परिस्थिती होईल. कोण कुठे जाईल आज आपला कोणाला सांगता येत नाही, असं मलिक म्हणालेत.

सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण?

राज्यात पुन्हा सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार? यावरही मलिकांनी भाष्य केलं आहे. अजितदादा पवार ठरवतील कोणाला मुख्यमंत्री करायचे आहे. निश्चित रूपाने दादा किंगमेकर होणार आणि होणार आहेत. इथे पक्ष विजयी होणार नाही जनता विजयी होतील, असंही नवाब मलिक म्हणालेत.

विधानसभा निवडणुकीवर काय म्हणाले?

काल माघार घेण्याची तारीख होती आणि माझ्या बद्दल गैरसमज होता की नवाब मलिक माघार घेणार आहेत. मला अजितदादा पवारांनी स्पष्टपणे उमेदवारी दिली आहे. तर माघार घेण्याच्या सवाल नाही आहे. आज संध्याकाळी चार वाजता आमच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन आहे आणि पाच वाजल्यापासून रोड सुरू आहे, असं मलिक म्हणाले

मी स्वतः निवडणूक लढत नाही लोकांच्या आग्रह आणि लोकांच्या लोकांचे मागणी अनुसार आम्ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. इथे लोक त्रस्त आहे ड्रग्स इथे मोठी समस्या आहे. दुसरी मोठी समस्या इथे गुंडगिरी आहे. लोकं गुंडगिरीने त्रस्त आहेत. शिक्षणाची व्यवस्था नाही, मेडिकलची व्यवस्था नाही, कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडचा मोठी प्रश्न आहे. शंभर टक्के मी इथून निवडून येणार आहे. नवाब मलिक आणि संघर्ष नाते कधी संपतच नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.