Mumbai : बोरीवली पूर्व पश्चिम प्रवास आता एकदम सुसाट! नवा उड्डाणपूल सज्ज, जाणून घ्या पुलाची वैशिष्ट्य

| Updated on: Jun 18, 2022 | 1:55 PM

Mumbai News : मुंबईकरांना ईस्ट-टू-वेस्ट असा प्रवास करण्यासाठी बोरीवलीचा हा नवा पूल फायदेशीर ठरणार आहे.

Mumbai : बोरीवली पूर्व पश्चिम प्रवास आता एकदम सुसाट! नवा उड्डाणपूल सज्ज, जाणून घ्या पुलाची वैशिष्ट्य
ईस्ट-टू-वेस्ट सुस्साट
Follow us on

मुंबई : मुंबईच्या (Mumbai News) बोरीवली पश्चिम आणि पूर्वेला (Borivali East west) जायचं म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. मात्र आता बोरीवली पूर्व-पश्चिम प्रवास सुसाट होणार आहे. कारण अखेर आर.एम. भट्टड मार्गावरील कोरा केंद्र उड्डाणपूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालाय. पूर्व-पश्चिम आणि पश्चिम पूर्व अशा एकूण चार लेन या पुलावर आहेत. या पुलामुळे एस व्ही रोडवरील वाहतूक कोंडीचा (Mumbai Traffic) प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल, असाही विश्वास व्यक्त केला जातोय. कोरा केंद्र पुलामुळे लिंक रोडवरुन आता थेट वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर जाता येऊ शकेल. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरुन हा पूल विस्तारीत करण्यात आलाय. त्यामुळे वाहतुकीचा वेगही वाढले आणि वेळही वाचेल, असा विश्वास प्रशासनाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण केलं जाईल. या पुलासाठी एकूण 173 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. मुंबईकरांना ईस्ट-टू-वेस्ट असा प्रवास करण्यासाठी बोरीवलीचा हा नवा पूल फायदेशीर ठरणार आहे.

या पुलाच्या लोकर्पणप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री अनिल परब, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनिल राणे, आमदार सुनील शिंदे, पालिका आयुक्त-प्रशासर इकबाल सिंह चहल, अतिरीक्त आयुक्त पी. वेलरासू हेही उपस्थित असतील.

काय आहेत या पुलाची वैशिष्ट्य?

  1. नवा उड्डाणपूल आर.एम. भड्डट मार्गावर बांधलेला आहे.
  2. लिंक रोड आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे
  3. या उड्डाणपुलामुळे बोरिवली, कांदिवली, दहिसर आणि जवळपासच्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल
  4. एस व्ही रोड जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरुन विस्तारीत झाल्यानंन पश्चिम द्रुतगती महामार्ग ते
  5. लिंक रोड वाहतूक अधिक वेगानं आणि सुरळीत होईल
  6. या उड्डाणपुलाची लांबी 137 मीटर असून रुंदी 15.3 मीटर इतकी आहे
  7. या उड्डाणपुलावर दोन्ही मार्गांवर प्रत्येकी दोन लेन आहे. दोन पूर्व पश्चिम आणि दोन पश्चिम पूर्व अशा दोन्ही बाजूने हा पूल वाहतुकीसाठी खुला असेल
  8. ऐन पावसात या ब्रीजमुळे अनेकांना फायदा होणार आहे.

दरम्यान, या पुलाला दिवंगत सीडीएस जनरल बिपीन रावत यांचं नाव दिलं जावी अशी मागणी भाजपने केली आहे. सुरुवातीला या उड्डाणपुलाच्या कामासाठी 161 कोटी रुपयांची तरतूद कऱण्यात आली होती. तसंच दोन वर्षांत या उड्डाणपुलाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र हे काम पूर्णत्वास यायला खरंतर चार वर्ष गेली आहे. 15 नोव्हेंबर 2018 ला सुरु झालेलं हे काम जून 2022 मध्ये अखेर पूर्ण झालं. लांबलेल्या कामाच्या वेळेमुळे या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचा खर्चही वाआढून 651 कोटी रुपयांपर्यंत गेलाय.