AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मटण-मासे खात असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त Video

सोशल मीडियावर इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्याने मांसाहार करत असाल तर मुंबईच्या ताडदेवमध्ये घर मिळणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

Mumbai : मटण-मासे खात असाल तर ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त Video
Bhavesh KavareImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 12, 2026 | 7:19 PM
Share

सोशल मीडियावर इस्टेट एजंट भावेश कावरेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्याने मांसाहार करत असाल तर मुंबईच्या ताडदेवमध्ये घर मिळणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. ही मुंबई मराठी माणसाची आहे. आगरी-कोळी बांधवांची आहे. महाराष्ट्राच्या कष्टकरी, सर्वसामान्य माणसाची आहे. आणि मुंबईत कोणी काय खावं, काय खाऊ नये हे ठरवणारे तुम्ही कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मांसाहार करणाऱ्यांना ताडदेवमध्ये घर नाही – भावेश कावरे

इस्टेट एजंट भावेश कावरेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने म्हटले की, ‘मांसाहार करत असाल तर इथे घर मिळणार नाही. शुद्ध शाकाहारी असाल तर आम्हाला संपर्क करा. ताडदेवमध्ये असणाऱ्या हे 2 BHK घर आहे. याचा कार्पेट एरिया 900 स्क्वेअर फूट असणार आहे. या घराच्या बाल्कनीतून साऊथ मुंबईचे विहंगम दृष्य दिसत आहे. या घरातून तुम्हाला समुद्राचाही नजारा पहायला मिळेल. हे घर 6 कोटी 30 लाखांना मिळत आहे. यात एक कार पार्किंगची जागाही मिळत आहे. नॉनव्हेज खात असाल तर इथे घर मिळणार नाही.’

सोशल मीडियातून संताप

यावर मराठी तरूण शुभम करपे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ही मुंबई मराठी माणसाची आहे. आगरी-कोळी बांधवांची आहे. महाराष्ट्राच्या कष्टकरी, सर्वसामान्य माणसाची आहे. आणि मुंबईत कोणी काय खावं, काय खाऊ नये हे ठरवणारे तुम्ही कोण? माणूस मच्छी, मटण किंवा चिकन खातो म्हणून त्याला घर नाकारणं ही फक्त घर देण्याची मनमानी नाही ही उघड सामाजिक भेदभावाची मानसिकता आहे.

मुंबईत पिढ्यानपिढ्या मच्छी खाणाऱ्या मराठी माणसाला आता त्याच्या ताटावरून घर मिळणार की नाही हे ठरवलं जाणार का? हे वारंवार आणि मुद्दाम केलं जात असेल, तर याला ठामपणे विरोध झालाच पाहिजे. मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही. मराठी माणसाच्या संस्कृतीवर, जगण्याच्या पद्धतीवर आणि अन्नाच्या निवडीवर बंधनं घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. भेदभाव करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत आणि लोकशाही मार्गाने योग्य तो धडा शिकवावाच लागेल.

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप