AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत तरंगतं सोनं सापडलं; किंमत ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील!

मुंबईच्या मालवणी पोलिसांनी १.१५ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त केली असून बोरिवलीच्या एका २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत तरंगतं सोनं सापडलं; किंमत ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील!
mumbai Whale Vomit
| Updated on: Apr 26, 2026 | 8:02 AM
Share

मुंबईच्या मालवणी पोलिसांनी वन्यजीव तस्करांविरुद्ध एक अत्यंत धाडसी आणि मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तब्बल १ कोटी १५ लाख ७० हजार रुपये किंमत असलेली व्हेल माशाची उलटी (Ambergris) जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेल्या वस्तूची तस्करी करण्यासाठी एक तरुण मालाड पश्चिम परिसरात येणार होता, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अदनान आसिफ खान (२४) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १.१५७ किलो ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सापडली. आरोपी अदनान हा बोरिवली पूर्व येथील कुलपवाडी, राईटेकडी, शिवशक्ती चाळीत राहणारा आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

ही व्हेल माशाची उलटी एकूण १.१५७ किलो ग्रॅम वजनाची होती. या व्हेल माशाच्या उलटीचा सौदा १ कोटी १५ लाख ७० हजार इतका ठरला होता. ही उलटी बेकायदेशीर रित्या विकण्याच्या तो तरुण मालाडला आला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला मुद्देमालासह रंगेहाथ अटक केली. यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

कायदेशीर कलमे आणि गुन्हा दाखल

‘स्पर्म व्हेल’ हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या अनुसूची १ मध्ये नमूद असलेला अत्यंत संरक्षित प्राणी आहे. या प्राण्याच्या कोणत्याही अवयवांची किंवा उत्पादनांची विक्री करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०७/२०२६ नुसार आरोपीवर खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १३२, ११८ (२), वन्यजीव संरक्षण कायदा १९७२: कलम २, ३९, ४४, ४८ (अ), ४९ (ब), ५७, ५१ या कलमातंर्गत आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे.

व्हेल माशाच्या उलटीला का असते इतकी मागणी?

व्हेल माशाची उलटीला शास्त्रीय भाषेत ‘अँबरग्रीस’ (Ambergris) म्हटले जाते. हा पदार्थ स्पर्म व्हेल माशाच्या पचनसंस्थेतून बाहेर पडतो. याला समुद्रातील तरंगते सोने असेही म्हटले जाते. याचा उपयोग प्रामुख्याने जगभरातील अत्यंत महागडी सुगंधी द्रव्ये (Perfumes) बनवण्यासाठी केला जातो. सुंगधाला दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची नैसर्गिक क्षमता या पदार्थात असल्याने काळ्या बाजारात याला सोन्यापेक्षाही जास्त किंमत मिळते. मात्र, वन्यजीव कायद्यानुसार भारतात याची खरेदी-विक्री करणे कायदेशीररीत्या गुन्हा आहे.

सध्या मालवणी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे एखादी आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय आहे का? हा माल कुठून आणला होता, याचा शोध घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर