AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवालो जरा संभलके ! पावसामुळे अभिनेता जॅकी श्रॉफ याने शेअर केली पोस्ट म्हणाला…

मुंबई आणि परिसरात झाड कोसळणे, भिंती खचणे, रस्ता खचणे आणि पाण्यात आणि उघड्या गटारात नाल्यात पडून अनेकांचे बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांनी काळजी घ्यावी असे वातावरण शनिवारीही मुंबईत होते. त्यात आता कलाकारांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मुंबईवालो जरा संभलके ! पावसामुळे अभिनेता जॅकी श्रॉफ याने शेअर केली पोस्ट म्हणाला...
Jackie Shroff share post of mumbai rains
| Updated on: Jul 04, 2026 | 8:39 PM
Share

मुंबई आणि उपनगरांना पावसाने गेली दोन ते तीन दिवस अक्षरश: झोडपल्याने मुंबईची तुंबई झाली आहे. शनिवारी आणि रविवारी देखील असाच पाऊस कोकण रिजनमध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारच महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे. मुंबई, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना शनिवारी सुटी जाहीर करण्यात आली होती. मुंबईत जुहू येथे समुद्राचे पाणी किनारपट्टीच्या बाहेर आल्याचे व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे. जुहूतील बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यातही पाणी शिरल्याचे म्हटले जात आहे. आता अभिनेता जॅकी श्रॉफ यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

अभिनेता जॅकी श्रॉफ हा कोणतेही स्टारडम न बाळगता सर्व चाहत्यांना वागणूक देत असतो. कधी चाहत्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो देणे असो की आणखी काही त्याच्यातला मुंबईकर सारखा जागा असतो. जॅकी श्रॉफ यांनी आता एक मुंबईच्या पावसाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओत जग्गूदादा म्हणजे जॅकी श्रॉफ आपल्या कारमधून मुंबईतील रस्त्यावरील पाण्यातून मार्ग काढताना दिसत आहे. या व्हिडीओत त्याने “Mumbai walo zara sambhalke! अशी कॅप्शन दिली आहे. मुंबईकरांनी काळजी घ्यावी, सुरक्षित रहा असा सल्ला दिला आहे. मुंबईतील चेंबूर येथे शाळेच्या बसवर वृक्ष कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर काल गुरुवारी उघड्या गटारात पडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी मुंबईकरांना काळजी घेण्यास सांगितले आहे.

कलाकारांनाही पावसाचा फटका

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूच्या बंगल्यात देखील पाणी शिरले आहे. अलिकडे अभिनेत्री उर्वशी ढोलकीया हीचा मुलगा क्षितीज ढोलकीया याच्या कारवर मोठे झाड कोसळले होते. ढोलकीया यांनी हा क्षण सोशल मीडियावर शेअर करीत सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही सर्व सुरक्षित आहेत असे म्हटले आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने मदत केल्याने त्यांनी आभार मानले आहेत. आयएमडीने मुंबई, ठाणे आणि पालघर येथे रेड अलर्ट जारी करीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे.

येथे पोस्ट वाचा –

View this post on Instagram

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ