मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले, बोट उलटल्याने दोन जण बेपत्ता

| Updated on: Aug 06, 2023 | 7:27 PM

तिघांपैकी एका जणाने समुद्र पोहून स्वतःला बाहेर काढले. उरलेल्या दोन जणांच्या बाबतीत अद्याप पत्ता लागला नाही. या दोन जणांचा शोध आज सकाळपासून घेण्यात आला.

मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात गेले, बोट उलटल्याने दोन जण बेपत्ता
Follow us on

मुंबई : समु्द्रात सध्या पाणी जास्त आहे. पावसाचे पाणीही पडत आहे. त्यामुळे समुद्रात जाताना खबरदारीचा इशारा देण्यात आलाय. काही मासेमार मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. तीन जण एका बोटीने काल रात्री नऊ वाजता मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. समृद्रात गेल्यानंतर त्यांची बोट उलटली. तिघांपैकी एका जणाने समुद्र पोहून स्वतःला बाहेर काढले. उरलेल्या दोन जणांच्या बाबतीत अद्याप पत्ता लागला नाही. या दोन जणांचा शोध आज सकाळपासून घेण्यात आला. पण, अद्याप ते बेपत्ता आहेत. उशेणी भंडारी आणि विनोद गोयल अशी बेपत्ता झालेल्या मच्छिमारांची नावे आहेत.

शोध मोहिमेसाठी हेलिकॅप्टरची मदत

बोटीसह बेपत्ता झालेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध सुरू आहे. लाईफ गार्ड, बीएमसी आणि कोस्ट गार्डचे पथक सतत शोध मोहीम राबवत आहेत. समुद्रात बुडालेल्या मच्छिमारांच्या शोध मोहिमेसाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत या दोन्ही मच्छिमारांचा काहीही पत्ता लागलेला नाही. अशी माहिती लाईफ गार्डचे किरण गांजवे यांनी दिली.

एकाने वाचवले स्वतःचे प्राण

तीन मच्छिमारी काल रात्री मासेमारीसाठी गेले होते. मध्यरात्री बोट उलटली. त्यामुळे तिघेही बुडाले. त्यापैकी एकाने पोहून स्वतःला समुद्राच्या बाहेर काढले. इतर दोन जणांचे काय झाले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्या दोन जणांसाठी शोधमोहीम राबवण्यात आली. परंतु, अद्याप त्या दोघांचा शोध लागला नाही.

हेलिकॅप्टरची मदत

दोन जण बेपत्ता असल्याने प्रशासनाने हेलिकॅप्टरचा वापर केला. त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हेलिकॅप्टर समुद्रावर घिरक्या घालत होता. पण, त्यांना त्या दोघांचा अद्याप पत्ता लागला नाही. लाईफ गार्ड, कोस्ट गार्डचे पथकही बेपत्ता असलेल्या मासेमारांचा शोध घेत आहेत. या मासेमारांच्या कुटुंबीय चिंताग्रस्त झाले आहेत. नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गेले होते. अचानक ही दुर्घटना घडली. त्यामुळे मासेमारांचे नातेवाईक या बेपत्ता असलेल्या मासेमारांचा पत्ता लावण्याचा प्रयत्न करत आहेत.