
गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 27 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात युती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांमी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला सांगितला आहे. जो जिंकेल त्याची जागा… हे आमचं सूत्र आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसंच इंडियाचा चेहरा कोण असेल? यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसंच येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीच निवडणूक जिंकेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.
ज्या चर्चा आहेत त्या आम्ही वृत्तपत्रातून पाहतोय. आमचं असं म्हणणं आहे आणि ते सर्वांना माहीत आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा ही आम्ही त्यांना सांगतो जिंकेल त्याची जागा आहे हे आमचं सूत्र आहे. आमच्या आघाडीमध्ये जागेवरून ओढताण नाही. होणारही नाही. जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरती आमच्या तिन्ही पक्षाच एक मत आहे या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीला देखील नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही विरुद्ध लढायचं आहे. नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले, तर या देशाला हुकूमशाहीच्या काही ढकलत जाईल. विरोधी पक्षाला तिहार जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देशासाठी फार मोठा मंत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, या संविधानाचे महत्त्व सर्वात जास्त त्यांना माहिती आहे. संविधान वाचवण्याची आम्ही लढतो आहोत.
इंडिया आघाडीचा चेहरा कोण? अशी वारंवार विचारला होते. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंडिया आघाडीची एकजूट महत्वाची आहे. निवडणुकीनंतर आम्ही चेहरा ठरवू असं म्हटलं. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणतात ते खरं आहे. इंडिया आघाडीसाठी कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही. ज्या देशात तानाशाही आहे. त्या तानाशाहीचा राजकीय गट आहे तो गट तानाशाहीचा आपला एक चेहरा समोर आणतो. लोकशाहीत खूप चेहरे असतात. त्यामुळे लोकं कोणालाही निवडतात हे महत्वाचं आहे. असं राऊत म्हणालेत.