मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, तब्बल 10 दिवसात दीडशे पार

| Updated on: Oct 31, 2020 | 9:32 AM

मुंबईत केवळ 10 दिवसात कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ झाली आहे. (Mumbai Ward Wise Corona Patient Doubling Rate) 

मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, तब्बल 10 दिवसात दीडशे पार
Follow us on

मुंबई : मुंबईत केवळ 10 दिवसात कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीत वाढ झाली आहे. कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी तब्बल 57 दिवसांनी वाढून तो 100 दिवसांवरुन 157 दिवसांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे 20 ऑक्टोबरला पहिल्यांदा मुंबईत कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीने 100 दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर आता तो वाढून 157 दिवस इतका झाला आहे. (Mumbai Ward Wise Corona Patient Doubling Rate)

तसेच एफ दक्षिण विभागचा कोरोना रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 200 दिवस इतका झाला होता. विशेष म्हणजे इतके दिवसांचा टप्पा ओलांडणारा हा पहिला विभाग ठरला होता. तोच लौकिक कायम ठेवत या विभागाने आता 300 दिवसांचाही टप्पा ओलांडला आहे. या विभागाचे रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 362 दिवसांवर पोहोचला आहे.

या पाठोपाठ बी, जी दक्षिण, ए विभागांनीही 200 दिवसांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या बी विभाग 232 दिवस, जी दक्षिण 231 दिवस, ए विभाग 212 दिवस इतका रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे.

मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग किती? 

दिवस – विभाग 

  • 300 दिवसांपेक्षा जास्त – एफ दक्षिण
  • 200 दिवसांपेक्षा जास्त –  बी,जी दक्षिण आणि ए (3 विभाग)
  • 176 ते 199  – जी उत्तर, ई, एस, एम पूर्व (4 विभाग)
  • 151 ते 175 – के पूर्व, एफ उत्तर, आर उत्तर, टी,एन,डी, एच पूर्व (7 विभाग)
  • 126 ते 150 – एल, पी उत्तर , एच पश्चिम,एम पश्चिम, सी, पी दक्षिण, आर मध्य (7 विभाग)
  • 106 ते 125 – आर मध्य , आर दक्षिण, के पश्चिम (3 विभाग)

रुग्णावाढीच्या दुप्पट होण्याचा कालावधी

20 ऑक्टोबर – 100 दिवस
24 ऑक्टोबर – 126 दिवस
29 ऑक्टोबर – 150 दिवस

?रुग्ण दुप्पट होण्याचा सर्वात जास्त कालावधी असलेले विभाग?

एफ दक्षिण – 362 दिवस
बी – 232 दिवस
जी दक्षिण – 231 दिवस
ए – 212 दिवस
जी उत्तर – 198 दिवस

?रुग्ण दुप्पट होण्याचा सर्वात कमी कालावधी असलेले विभाग? 

सी – 130 दिवस
पी दक्षिण – 129 दिवस
आर मध्य – 128 दिवस
आर दक्षिण – 124 दिवस
के पश्चिम – 120 दिवस

(Mumbai Ward Wise Corona Patient Doubling Rate)

संबंधित बातम्या :  

खाडी, समुद्र प्रदूषित, राष्ट्रीय हरित लवादाकडून मुंबई महापालिकेला 30 कोटींचा दंड

मुंबईतल्या नाल्यांमधून हाजीअलीपर्यंत वाहत गेलेल्या ‘त्या’ मृतदेहाचा चौकशी अहवाल समोर, मृत्यूचं गूढ मात्र कायम