‘लंडनच्या जावया’ने मुंबईकर कुटुंबाला लुबाडले, लग्न जुळवून 7.89 लाखांना गंडा

सीमाशुल्क अधिकारी बोलत असल्याची खोटी बतावणी करुन तरुणीला बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये 7.89 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. अखेर कुटुंबाला आपली फसगत झाल्याची जाणीव झाली.

'लंडनच्या जावया'ने मुंबईकर कुटुंबाला लुबाडले, लग्न जुळवून 7.89 लाखांना गंडा
Follow us
| Updated on: Jul 13, 2020 | 4:06 PM

मुंबई : विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवरुन झालेली ओळख मुंबईतील 26 वर्षीय तरुणीला चांगलीच महागात पडली. लंडनमध्ये राहत असल्याचे सांगून लग्न जुळवल्यानंतर आरोपीने तरुणीची 7.89 लाखांना लूट केल्याचे समोर आले आहे. (Mumbai woman loses 7.89 Lakh to fraudster met via Matrimonial Website)

मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी तिच्या कुटुंबियांसह शिवडी भागात राहते. 1 जून रोजी तरुणीने एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर आपले प्रोफाइल तयार केले. त्यानंतर ‘अंकुश लोखंडे’ असे स्वतःचे नाव सांगणार्‍या प्रोफाइलवरुन 12 जून रोजी तिला संवाद साधण्यासाठी रिक्वेस्ट आली.

भामट्याने आपण लंडनमध्ये स्थायिक आर्किटेक्ट असल्याचा दावा केला. त्यानंतर दोघांनी आपापल्या मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. काही दिवस बोलणे झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

हेही वाचा : आधी फ्रेंड रिक्वेस्ट, मग अश्लील फोटो, पुण्यापासून रत्नागिरीपर्यंत जाळं, बारामतीच्या तरुणाला बेड्या

26 जून रोजी ‘कथित अंकुश लोखंडे’ने आपण 28 जूनला मुंबईत येणार असल्याचे तरुणीला सांगितले. त्याने तिला आपल्या विमान तिकिटांचे तपशीलही पाठवले होते, जे अर्थातच बनावट होते. लोखंडेने विमानात चढतानाची एक व्हिडिओ क्लिपही पाठवली, अशी माहिती  पोलिसांनी दिली आहे.

दुसर्‍याच दिवशी तरुणीला दिल्लीच्या सीमाशुल्क विभागाच्या नावे एक फोन आला. आपण सीमाशुल्क विभागाचा अधिकारी बोलत असल्याची खोटी बतावणी फोनवर करण्यात आली. सोन्याच्या दागिन्यांसह बरेच सामान घेऊन अंकुश लोखंडे जात असल्याने त्याला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतल्याचे संबंधित व्यक्तीने फोनवर सांगितले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आरोपीने पीडितेला मदत करण्याची विनंती केली. तिनेही अंधपणे विश्वास ठेवून ती मान्य केली आणि लोखंडेने दिलेल्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये 7.89 लाख रुपये जमा केले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

पैसे मिळाल्यानंतर लोखंडेने आपण 3 जुलै रोजी दिल्लीहून मुंबईला विमानाने येत असल्याचे सांगितले. पीडिता आणि तिचे वडील लोखंडेला घेण्यासाठी विमानतळावर गेले होते, परंतु अनेक तास थांबूनही तो आला नाही किंवा फोनवर त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर त्यांना आपली फसगत झाल्याची जाणीव झाली. पोलिसांनी लोखंडेविरुद्ध विविध कलमांखाली फसवणूक आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. (Mumbai woman loses 7.89 Lakh to fraudster met via Matrimonial Website)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.