AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादरच्या स्टार मॉलमध्ये थाई स्पाच्या नावाखाली नको तो प्रकार, हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

गर्दीने गजबजलेल्या दादर परिसरातील स्टार मॉलमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील रिबेल थाई स्पावर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले.

दादरच्या स्टार मॉलमध्ये थाई स्पाच्या नावाखाली नको तो प्रकार, हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Star Mall RacketImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 9:32 AM
Share

मुंबईतील दादर परिसर नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो. शिवाजी पार्क, ऐतिहासिक शिवाजी मंदिर नाट्यगृह आणि आसपासच्या रहिवासी भागामुळे येथे दररोज शेकडो नागरिक आणि ग्राहकांची वर्दळ असते. अशा सुरक्षित आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भागात स्टार मॉलमधील एका स्पामध्ये हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी ‘रिबेल थाई स्पा’वर अचानक धाड टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

स्पामधील चार जणांना अटक

या कारवाईदरम्यान पोलिसांनी २५ ते ३० वयोगटातील सहा तरुणींची सुटका केली असून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये आशा परमार (महिला दलाल), साहिल पिल्लई (‘रिबेल थाई स्पा’चा मॅनेजर), कैलाश यादव आणि करण वर्धन यांचा समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक आत पोहोचताच तेथे सहा पीडित तरुणी आढळून आल्या. आरोपींनी स्पाच्या नावाखाली हे सेक्स रॅकेटचे जाळे उभे केले होते. अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नव्हता.

अचानक पोलिसांची धाड, 20 ते 30 वयोगाटातील तरुणींची सुटका

‘रिबेल थाई स्पा’च्या नावाखाली या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या तरुणी, महिला दलाल आणि स्पा मॅनेजर असे नेटवर्क उभे करण्यात आले होते. पण पोलिसांनी अचानक धाड टाकल्यानंतर तेथे 25 ते 30 वयोगटातील सहा तरुणी काम करत असल्याचे आढळले. पोलिसांनी या तरुणींची सुटका केली आहे. दादरसारख्या परिसरात असा व्यवसाय सुरु असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलिसांच्या तपासातून या सगळ्याविषयी आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हा प्रकार नक्की किती दिवसांपासून सुरू होता आणि यात आणखी कोणाचे साटेलोटे आहे का? याचा सखोल तपास शिवाजी पार्क पोलीस करत आहेत.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?