मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी यांची निर्घृण हत्या

| Updated on: Aug 10, 2019 | 11:59 PM

मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी यांची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याची हत्या करून मृतदेह बेडशीटमध्ये बांधून फेकण्यात आला. हा मृतदेह विरारच्या खणीवडे खाडीत सापडला.

मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी यांची निर्घृण हत्या
Follow us on

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिशनेनंदू चौधरी यांची निर्घृण हत्या झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याची हत्या करून मृतदेह बेडशीटमध्ये बांधून फेकण्यात आला. हा मृतदेह विरारच्या खणीवडे खाडीत सापडला.

विरार पूर्व खाणीवडे रेतीबंदरावर शुक्रवारी (9 ऑगस्ट) अज्ञात व्यक्तींनी चौधरी यांची हत्या करून मृतदेह फेकला. याबाबत अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. शनिवारी (10 ऑगस्ट) रात्री या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर हा मृतदेह मुंबईतील प्रसिद्ध ‘आर्ट डायरेक्टर’ क्रिशनेनंदू चौधरी यांचा असल्याचे समोर आले. ही हत्या कोणी आणि का केली याविषयी अद्याप कोणतीही माहिती नाही. याच्या तपासासाठी 3 स्वतंत्र पथकं तयार करण्यात आली आहेत. ते आरोपीच्या तपासासाठी रवाना झाल्याची माहिती विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे यांनी दिली.

क्रिशनेनंदू चौधरी गोरेगाव येथे राहत होते. ते लग्न, फिल्म स्टुडिओ याठिकाणी डेकोरेशनचे डिझाईन करणारे प्रसिद्ध डायरेक्टर होते. 7 ऑगस्ट रोजी ते कामानिमित्त एका व्यक्तीकडे बैठकीसाठी गेले. मात्र, रात्री 8 नंतर ते मालाडमधून अचानक बेपत्ता झाले. याबाबत मालाड मालवणी पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल आहे.

आरोपींनी धारदार हत्याराने निर्घृणपणे हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बेडशीटमध्ये बांधून वाहत्या पाण्यात फेकला, असा संशय आहे. त्यांचा मृतदेह विरार पूर्व खणीवडे रेटिबंदर 1 या ठिकाणी सापडला. ही हत्या व्यावसायिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.