नाना पाटेकर यांच्या निधनाचा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना धक्का, पाया पडतानाच व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

दया नायक यांना नाना पाटेकर यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. 'अब तक छप्पन' मधील साधू अगाशेच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांची ओळख अधिक घट्ट झाली होती. नायक यांनी नानांना भाऊ मानले होते आणि त्यांच्या जाण्याने ते खूप दुःखी आहेत. त्यांनी नानांच्या अभिनयाचे आणि मैत्रीचे कौतुक करत एक्सवर (X) भावूक पोस्ट व व्हिडीओ शेअर करून श्रद्धांजली वाहिली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनाचा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना धक्का, पाया पडतानाच व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
nana patekar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 08, 2026 | 11:38 PM

कलेची नक्कल आयुष्य करते, यापेक्षा आयुष्य कलेची नक्कल फार मोठ्या प्रमाणावर करते… ऑस्कर वाइल्ड यांचे हे शब्द मुंबईचे प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि अभिनेता नाना पाटेकर यांच्याशीच जणू निगडीत आहेत, असं दिसतंय. नाना पाटेकर आणि दया नायक यांच्यात अतूट मैत्री होती. मुंबईत असल्यावर दोघांची नेहमी भेट व्हायची. दया नायक तर नानांना भाऊच मानायचे. त्यांच्या जाण्याची बातमी समजल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी एक्सवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नाना पाटेकर यांचा अब तक छप्पन हा सिनेमा दया नायक यांच्यावर आधारित होता. यातील साधू अगाशेही व्यक्तिरेखा दया नायक यांच्याशी मिळती जुळती होती. त्यावेळी नाना पाटेकर यांच्या या भूमिकेचंही खूप कौतुक झालं होतं. दया नायक आणि नाना पाटेकर यांच्यात चांगली मैत्रीही होती. आज नाना पाटेकर यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्याने दया नायकही हादरून गेले आहेत.

Loading...

दया नायक यांनी एक्सवर पोस्ट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. तुम्ही निघून गेलात यावर विश्वासच बसत नाहीये. काही दिवसांपूर्वीच आपलं बोलणं झालं होतं. तो आपला शेवटचा संवाद होता, हे मनाला अजून पटत नाहीये, असं दया नायक यांनी म्हटलं आहे.

 

लोकांना पोलीस अधिकारी समजला

साधू अगाशेच्या व्यक्तिरेखेने भारतीय प्रेक्षकांवर चांगलाच परिणाम केला. कारण नाना पाटेकर यांनी अंडरवर्ल्डचा बोलबाला असलेल्या शहरात काम करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचे साहस आणि संघर्ष अत्यंत धाडसीपणे मांडला. दया नायक म्हणतात, नाना पाटेकर यांची व्हर्सटॅलिटी आणि त्यांनी ज्या प्रामाणिकपणे ती भूमिका साकारली, त्यामुळे लोकांना खाकी वर्दीच्या मागे असलेला माणूस समजण्यास मदत मिळाली. दबाव, माणुसकी आणि एक पोलीस अधिकारी होण्याचा खरा अर्थ काय आहे, हे समजलं.

तुम्ही उत्कृष्ट आणि विविध प्रकारचे रोल करण्यात माहीर होता. तुम्ही ज्या अनोख्या पद्धतीने भूमिका साकारली ती कमाल होती. तुम्ही मला प्रेरित केलं. खरं तर तुम्हीच माझ्या व्यक्तिरेखेशी प्रेरित भूमिका निभावत होतात. तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे ही भूमिका साकारली आहे, असं दया नायक यांनी म्हटलं आहे.

तुम्ही मित्र होता, हे माझे भाग्य

दया नायक यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. यात दया नायक हे नाना पाटेकर यांच्या पाया पडताना दिसत आहेत. त्यानंतर ते आपल्या पोस्ट म्हणतात, तुम्ही अभिनेते तर मोठे होताच पण त्यापेक्षाही तुम्ही मित्र म्हणूनही खूप मोठे होता. ज्याच्यावर नेहमी विश्वास टाकता येईल, इतके तुम्ही जवळचे होता. प्रेमळ, विश्वासू, दर्यादिल आणि संकटाच्या काळात साथ देणारे. मला तुमची नेहमीच आठवण येईल. तुमच्याशी माझा परिचय होता, मी तुम्हाला मित्र आणि भाऊ म्हणू शकत होतो, हे माझं भाग्यच समजतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us