मग मनमोहन सिंगांनी दिलेला जीएसटीचा कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंचा मोदींना सवाल

| Updated on: Feb 08, 2021 | 1:58 PM

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकच कृषी उत्पन्न बाजार समिती असावी, असं म्हटलं होतं. त्याचा हवाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिला. (nana patole slams narendra modi over gst)

मग मनमोहन सिंगांनी दिलेला जीएसटीचा कायदा का आणला नाही?; नाना पटोलेंचा मोदींना सवाल
नाना पटोले
Follow us on

मुंबई: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकच कृषी उत्पन्न बाजार समिती असावी, असं म्हटलं होतं. त्याचा हवाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिला. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदींनी मनमोहन सिंग यांचं उदाहरण दिलं. मग मनमोहन सिंग यांनी जो जीएसटीचा कायदा आणला होता. तोच का संसदेत मंजूर केला नाही?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. (nana patole slams narendra modi over gst)

नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संसदेत बोलले हीच नवी बातमी आहे. नाही तरी एरव्ही ते संसदेऐवजी सभांमधूनच बोलत असतात. त्यांनी कृषी कायद्याचं समर्थन करण्यासाठी थेट मनमोहन सिंग यांचं उदाहरण दिलं. मग मनमोहन सिंग यांनी जीएसटीसाठी जो कायदा आणला होता, तोच जशास तसा स्वीकारला का नाही? असा सवाल पटोले यांनी केला. देशाचे पंतप्रधान खोटं बोलत आहेत. पुन्हा पुन्हा खोटं बोलत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपने परंपरा राखावी

राज्यात विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडून आणण्याची परंपरा आहे. भाजपने ही परंपरा कायम राखावी, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं. काँग्रेसकडे राहिल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच दोन दिवसांपूर्वी सांगितल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

ऑगस्ट क्रांती मैदानावर पदभार स्वीकारणार

दरम्यान, येत्या 12 फेब्रुवारी रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर भव्य कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. सगळ्यांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी पक्ष वाढवावा. आम्हीही आमचा पक्ष तळागाळापर्यंत नेऊ, असंही त्यांनी सांगितलं.

ऑपरेशन लोटस होणार नाही

दरम्यान, पटोले यांनी राज्यात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ऑपरेशन लोटस वगैरै काहीही होणार नाही. भविष्यात भाजप पक्ष राज्यात नावालाही उरणार नाही, असा दावाही त्यांनी केला. (nana patole slams narendra modi over gst)

मोदी काय म्हणाले होते?

मोदींनी राज्यसभेत कृषी कायद्यावर संबोधित करताना मनमोहन सिंग यांचं उदाहरण दिलं होतं. शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करण्याचं स्वातंत्र्य देण्याचं आणि त्यासाठी एकच कृषी बाजार निर्माण करण्याचा मनोदय मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला होता. आम्ही दुसरे काय करतोय. तेच तर करत आहोत. जे मनमोहन सिंगानी सांगितलं तेच मोदी करत आहेत म्हणून तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. (nana patole slams narendra modi over gst)

 

संबंधित बातम्या:

मनमोहन सिंगानी जे सांगितलं तेच करतोय, तुम्हाला अभिमान वाटायला हवा; मोदींचा काँग्रेसवर पलटवार

PM Narendra Modi full speech highlights : शेतकरी आंदोलन, शरद पवार ते मनमोहन सिंह, मोदींचं संपूर्ण भाषण

MSP चं काय होणार, नरेंद्र मोदी राज्यसभेत काय म्हणाले? शेतकऱ्यांना काय केलं आवाहन?

(nana patole slams narendra modi over gst)