काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री, परब, आमदार दिलीप लांडेंविरोधात हायकोर्टात याचिका; आरोप काय?, वाचा सविस्तर

| Updated on: Aug 27, 2021 | 10:24 AM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. (naseem khan filed petition against dilip lande, cm uddhav Thackeray)

काँग्रेस नेत्याची मुख्यमंत्री, परब, आमदार दिलीप लांडेंविरोधात हायकोर्टात याचिका; आरोप काय?, वाचा सविस्तर
dilip lande
Follow us on

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याविरोधात अपप्रचार केला. तसेच प्रचार संपल्याची मुदत संपल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचार केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे वर्तवली जात आहे. (naseem khan filed petition against dilip lande, cm uddhav Thackeray)

ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात आज सकाळी 10.45 वाजता सुनावणी होणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नसीम खान हे चांदीवली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी खान यांचा 409 मतांनी पराभव केला होता. 20 ऑक्टोबर 2019 रोजी शिवसेना पक्षप्रमुख व विद्यमान मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे, सध्याचे परिवहनमंत्री अनिल परब व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचाराच्या मुदतीनंतरही प्रचार केला होता, असं या याचिकेत म्हटलं आहे.

आरोप काय?

21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान घेण्यात आले होते. तसेच प्रचारादरम्यान आपण ‘पाकिस्तान जिंदाबाद’ च्या घोषणा दिल्याचे खोटे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले होते, असेही खान यांनी याचिकेत म्हटले आहे. प्रत्यक्ष मतदानाला 48 तास उरले असताना प्रचार न करण्याचा निवडणूक आयोगाचा नियम असताना ठाकरे यांनी हा नियम मोडलाय. बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेमुळे लांडे 409 मतांनी निवडून आले, असे खान यांनी याचिकेत म्हटले आहे. यावर कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

अशी रंगली लढत

शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवणारे दिलीप लांडे यांना या निवडणुकीत 85 हजार 879 मते मिळाली होती. तर चौथ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या नसीम खान यांना 85 हजार 470 मते मिळाली होती. या अटीतटीच्या निवडणुकीत खान यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव झाला होता. (naseem khan filed petition against dilip lande, cm uddhav Thackeray)

 

संबंधित बातम्या:

…म्हणून देशातील जुनी वाहने भंगारात काढणे गरजेचे: नितीन गडकरी

अमिताभ बच्चन यांच्याकडून वर्षाला दीड कोटी मिळाल्याचा आरोप, बिग बींच्या बॉडीगार्डची पोलीस आयुक्तांकडून बदली

“भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, पक्ष फुटण्याच्या भीतीने राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात”

(naseem khan filed petition against dilip lande, cm uddhav Thackeray)