“भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, पक्ष फुटण्याच्या भीतीने राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात”

Nana Patole | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे माननीय राज्यपालांना भेटायला बारा आमदारांच्या नियुक्ती बाबत चर्चा करण्यासाठी जाणार होते. राज्यपालांच्या ऑफिसमधून सांगण्यात आलं होतं की. आम्ही वेळ देतो. मात्र, ती वेळ देण्यात आली नाही.

"भाजप फुटीच्या उंबरठ्यावर, पक्ष फुटण्याच्या भीतीने राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात"
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


मुंबई: राज्यपालांनी विधानपरिषेदत महाविकासआघाडीच्या 12 आमदारांची नियुक्ती केली तर भाजपमधील अनेकजण पक्षातून बाहेर पडतील, अशी भीती आहे. भाजप पक्ष सध्या या फुटीच्या उंबरठ्यावर असल्यामुळेच राजभवनाचं रुपांतर भाजप कार्यालयात करण्यात आल्याची उपरोधिक टिप्पणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली. राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास महाविकासआघाडी सरकार पूर्णपणे स्थिर असल्याचा संदेश जाईल. त्यामुळे मंत्रिपदाच्या आशेने भाजपमध्ये आलेले नेते बाहेर पडू शकतात, अशी भीती भाजपला वाटत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही 12 आमदारांच्या नियुक्तीत टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे माननीय राज्यपालांना भेटायला बारा आमदारांच्या नियुक्ती बाबत चर्चा करण्यासाठी जाणार होते. राज्यपालांच्या ऑफिसमधून सांगण्यात आलं होतं की. आम्ही वेळ देतो. मात्र, ती वेळ देण्यात आली नाही.

आता साडेपाच वाजता मुख्यमंत्र्यांचे सचिव पत्र घेऊन आता गेले आहेत. हायकोर्टाच्या निकालानुसार राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढावा, असे आदेश दिले होते. मात्र, त्याचे पालन न करता राज्यपाल दिल्लीला गेले तिथे जाऊन ते कोणाला भेटले हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. 12 आमदारांची नियुक्ती होऊ नये यासाठी हा प्रयत्न असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले.

राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी का टाळाटाळ करत आहेत?

भाजप पक्ष सध्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. राज्यपालांचा उपयोग जास्तीत जास्त भाजपाकडून केला जात आहे. राजभवन आता भाजपचे कार्यालय झाले आहे. भाजपने आयात केलेले अनेक नेते आहेत अनेक सिटिंग आमदार आहेत. त्यांना असं वाटतं की आता मंत्री आपण होणार नाही. त्यामुळे तेही चिंतेत असून त्यामुळे भाजपमध्ये फार चलबिचल सुरू झाली आहे. यापैकी अनेक नेते आणि आमदार माझ्या संपर्कात आहेत. 12 आमदारांची नियुक्ती झाली तर पक्ष फुटेल अशी भीती भाजपला आहे. त्यामुळे राज्यपालांकडून 12 आमदारांची नियुक्ती टाळण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला.

संबंधित बातम्या :

राज्यपालांचं वर्तन घटनेशी सुसंगत नाही, 12 आमदारांची नियुक्ती 15 दिवसात होणं अपेक्षित होतं : घटनातज्ज्ञ उल्हास बापट

भाजपने एक डाव भुताचा टाकला तर महागात पडेल, शेलारांचा संजय राऊतांना इशारा

12 आमदारांची यादी राजभवनात ‘सुरक्षित’; संजय राऊतांच्या टीकेनंतर सूत्रांची माहिती

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI