नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, 402 आयसीयू बेड, 173 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार

| Updated on: Aug 04, 2020 | 1:50 PM

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी चांगलाच कामाचा धडाका लावला आहे (Abhijit Bangar on ICU Beds Ventilators).

नवी मुंबई आयुक्तांचा कामाचा धडाका, 402 आयसीयू बेड, 173 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार
Follow us on

नवी मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी चांगलाच कामाचा धडाका लावला आहे (Abhijit Bangar on ICU Beds Ventilators). त्यांनी एकिकडे ‘मिशन ब्रेक द चेन’ या मोहिमेतून संसर्गावर नियंत्रण आणलं जातंय. दुसरीकडे रुग्णांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई क्षेत्रामध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेडची कमतरता असल्याने हा प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतलं आहे.

रुग्ण सुविधामध्ये वाढ करण्यासाठी अभिजीत बांगर यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महापालिका हद्दीतील गंभीर रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध व्हावेत यासाठी नेरुळ सेक्टर 5 येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत 200 आयसीयू बेड आणि 80 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्याचा करार करण्यात आला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्यावतीने 10 ऑगस्टपर्यंत 50 आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यानंतर 10 दिवसांच्या 3 टप्प्यांमध्ये 30 दिवसांमध्ये एकूण 200 आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यामुळे नवी मुंबईकरांसाठी 402 आयसीयू बेड, 173 व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग केला जात आहे, अशी माहिती आयुक्त अभिजीत बांगर सांगितले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दरम्यान, नवी मुंबईमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या एकूण कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 16 हजारावर पोहचली आहे. तसेच आतापर्यंतच्या कोरोना बळींची संख्या 500 वर पोहचली आहे. नवी मुंबईतील नागरिकांसाठी 3 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी आल्या आहेत. यात अनेकांचे जीवही गेले आहेत. मात्र, आता नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी आल्यापासून यंत्रणा कामाला लावली आहे. त्यांनी मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मिशन ब्रेक चेन हा उपक्रम जोरकसपणे राबवला आहे.

हेही वाचा :

आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री, आता विरोधीपक्ष नेतेही कोरोना पॉझिटिव्ह

Pune | पुणेकरांनो, हॉटेल-मॉलमध्ये जाताय? हे नियम वाचून घ्या

Konkan Ganeshotsav | मुंबईतून हजारो चाकरमानी कोकणात, सरकारने सोय न केल्याने ई-पासमध्ये भ्रष्टाचार, विरोधकांचा आरोप

Abhijit Bangar on ICU Beds Ventilators