आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री, आता विरोधीपक्ष नेतेही कोरोना पॉझिटिव्ह

सिद्धरामय्या यांना बंगळुरुच्या मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे

आधी कर्नाटकचे मुख्यमंत्री, आता विरोधीपक्ष नेतेही कोरोना पॉझिटिव्ह

बंगळुरु : कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 71 वर्षीय सिद्धरामय्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ विरोधीपक्ष नेत्यालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (Karnataka Opposition Leader Siddaramaiah tested Corona Positive)

“माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी लक्षणे तपासण्याची आणि स्वत:ला अलग ठेवण्याची विनंती करतो” असे ट्वीट सिद्धरामय्या यांनी केले आहे.

सिद्धरामय्या यांना बंगळुरुच्या मणीपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून देखरेख ठेवली जात आहे. सिद्धरामय्या यांना कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत, अशी माहिती मणीपाल रुग्णालयाने निवेदनात दिली.

कर्नाटकचे काँग्रेसमधील दिग्गज नेते सिद्धरामय्या यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा आहे. त्यांनी 2013 ते 2018 या कालावधीत कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी संध्याकाळी समोर आले होते. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले.

गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, त्यानंतर रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्याच दिवशी येडियुरप्पा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. एकामागून एक दिग्गज नेत्यांना कोरोना झाल्याचे समजताच भाजप समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. (Karnataka Opposition Leader Siddaramaiah tested Corona Positive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *