BS Yediyurappa Corona | कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोनाची लागण

BS Yediyurappa Corona | कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोनाची लागण

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली (Karnataka Chief Minister BS Yediyurappa Covid Positive) आहे.

Namrata Patil

|

Aug 03, 2020 | 12:43 AM

नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नुकतंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर आता येदियुरप्पांनाही कोरोना झाला आहे. (Karnataka Chief Minister BS Yediyurappa Covid Positive)

“मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी तब्ब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील, त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करावं,” असे आवाहन  कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी केले आहे.

अमित शाहांना कोरोना

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना रविवारी (2 ऑगस्ट) कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या या ट्विटनंतर भाजपसह अनेक नेत्यांनी अमित शाह यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत.

“कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे. (Karnataka Chief Minister BS Yediyurappa Covid Positive)

संबंधित बातम्या :

Amit Shah Corona | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

Amit Shah Corona | उदयनराजे, आव्हाड ते आठवले, अमित शाहांच्या स्वास्थ्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रार्थना

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें