Amit Shah Corona | उदयनराजे, आव्हाड ते आठवले, अमित शाहांच्या स्वास्थ्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रार्थना

Amit Shah Corona | उदयनराजे, आव्हाड ते आठवले, अमित शाहांच्या स्वास्थ्यासाठी दिग्गज नेत्यांची प्रार्थना

भाजपसह अनेक नेत्यांनी अमित शाह यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या (Amit Shah Corona Positive) आहेत.

Namrata Patil

|

Aug 02, 2020 | 7:01 PM

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर भाजपसह अनेक नेत्यांनी अमित शाह यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी शुभेच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत. (Amit Shah Corona Positive Many people Prayers for speedy recovery)

“कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्याने मी माझी चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मी आवाहन करतो, तुमच्यापैकी जो कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आला असेल, त्यांनी कृपया स्वत: विलगीकरणात राहावे आणि आपली चाचणी करुन घ्यावी” असे आवाहन अमित शाह यांनी केले आहे.

उदयनराजे, जितेंद्र आव्हाड, रामदास आठवलेंकडून प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना

“अमित शाह तुमची चिकाटी आणि इच्छाशक्ती हे प्रत्येक आव्हानाचे उदाहरण आहे. कोरोना या मोठ्या आव्हानावर लवकरच तुम्ही विजय प्राप्त करून देशवासियांच्या सेवेत पुन्हा दाखल व्हाल, असा आम्हाला विश्वास आहे,” असे ट्विट खासदार उदयनराजे यांनी केले आहे.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोव्हिड पॉझिटिव्ह. तब्बेत स्थिर,हॉस्पिटलमध्ये भरती. ते लवकरात लवकर बरे व्हावेत,या शुभकामना..!,” असे ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“देशाचे यशस्वी गृहमंत्री अमित शाह हे लवकरच बरे होतील, अशी मी प्रार्थना करतो. तुम्ही प्रत्येक लढाई जिंकली आहे. तुमच्या दृढ संकल्पाने तुम्ही कोरोनावर मात करुन लवकर बरे व्हाल,” असे ट्विट रिपाई नेते रामदास आठवले यांनी केले आहे. (Amit Shah Corona Positive Many people Prayers for speedy recovery)

देवेंद्र फडणवीस, राजनाथ सिंह यांच्याकडून प्रार्थना

“अमितजी तुमची चिकाटी आणि इच्छाशक्ती हे प्रत्येक आव्हानाचे उदाहरण आहे. कोरोनासारख्या इतक्या मोठ्या आव्हानावर तुम्ही नक्कीच विजय प्राप्त कराल, असा माझा विश्वास आहे. तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो,” असे ट्विट संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे.

दिल्लीत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अमित शाह अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. दिल्लीत वाढलेल्या चाचण्यांचे श्रेय महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहांना दिले आहे. मात्र गेल्या काही दिवसात अमित शाह यांनी अनेक कार्यक्रमांनाही उपस्थिती लावली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. मात्र या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत, असे दिसते. (Amit Shah Corona Positive Many people Prayers for speedy recovery)

संबंधित बातम्या : 

Amit Shah Corona | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें