नवी मुंबईकरांची ‘मेट्रो’वारी रखडली, चाचणी लांबणीवर

| Updated on: Aug 31, 2019 | 8:56 AM

गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो-1 चे (ी) स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) अजून तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

नवी मुंबईकरांची मेट्रोवारी रखडली, चाचणी लांबणीवर
Follow us on

नवी मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो-1 चे (ी) स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) अजून तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. नुकतंच तळोजा येथे नवी मुंबई मेट्रोची सिडकोकडून (City and Industrial Development Corporation – Cidco) चाचणी घेण्यात आली. यात Catenary Maintainance Vehicle (CMV) कडून testing मेट्रो मार्गावर टाकण्यात आलेल्या ओव्हर हेड वायरची (OverHead Wire) तपासणी करण्यात आली.

सिडकोतर्फे (Cidco) मेट्रो रेल्वेसाठी (Metro Railway) तयार केलेल्या पुलावरून ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यावर नोव्हेंबर ते डिसेंबरपूर्वी चाचणी घेण्यात येणार होती. मात्र मेट्रोचे पिलर (Metro Piller) आणि प्लॅटफॉर्म Metro Platform) तयार नसल्याने सिडकोने सहा वर्षांपूर्वी सुरु केलेली मेट्रो आत्तापर्यंत फक्त ट्रॅकपर्यंत मर्यादित राहिली आहे.

नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेंईधर (Belapur–Pendhar) या 11 किमीच्या मार्गावर सिडकोला 99 टक्के ट्रॅकचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. मात्र या मार्गावरील 11 रेल्वे स्थानके अद्याप पूर्ण झालेली नाहीत. हे मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत सिडकोचे तीन व्यवस्थापकीय संचालक बदलले. जुने कंत्राटदार दिवाळखोरीत निघाल्याने सिडकोने नव्या कंत्राटदारांच्या खांद्यावर रेल्वे स्थानकांच्या कामांची जबाबदारी सोपवली.

या मेट्रोच्या 11 स्थानकांपैकी सिडकोने 1 ते 6 मेट्रो स्थानकांच्या कामांसाठी प्रकाश कन्सोरियम यांना 127 कोटी रूपयांचे कंत्राट दिले आहे. तर 7 व 8 क्रमांकाचे मेट्रो स्थानकाचे काम बिल्ड राईड हा कंत्राटदारामार्फत सुरू आहे. तसेच 8 व 11 रेल्वे स्थानकाचे 43 कोटी रुपयांचे काम यूनिवास्तू आणि 10 क्रमांकाचा मेट्रो स्थानक तयार करण्याचे 53 कोटी रूपयांचे काम जे. कुमार यांना देण्यात आलं आहे.

सिडकोने उड्डाणपूल तयार करून त्यावर रेल्वे ट्रॅक बसवण्यात आला आहे. मात्र, रेल्वे स्थानकांची कामे पूर्ण नसल्याने 11 रेल्वे स्थानकांदरम्यान 150 मीटर पर्यंतचे रेल्वे ट्रॅक जोडण्यात अडचणी येत आहेत. हे ट्रॅक एकमेकांना जोडले नसल्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना मेट्रोची चाचणी घेताना अडचणी येत आहेत.

नवी मुंबईच्या मेट्रो मार्गाचे काम लांबणीवर पडल्यामुळे 2000 कोटींमध्ये होणारे काम आता 3000 कोटींमध्ये सिडकोतर्फे पूर्ण केले जाणार आहे. यापैकी 11 किमीचा रेल्वे उड्डाणपूल, वीज जोडण्या, सिग्नल यंत्रणा, मेट्रोचा कारशेड अशा प्रकारे 2000 कोटींची कामे सिडकोने पूर्ण केली आहेत. मात्र, रेल्वे स्थानकांचे बांधकाम व अंतर्गत सजावटीसाठी आणखी 1000 कोटींचा खर्च सिडकोला अपेक्षित आहे.

या सर्व सोपस्कारासाठी सुमारे 6 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने प्रत्यक्षात नवी मुंबईच्या मेट्रोची सफर करण्यासाठी अजून तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लागेल, असा अंदाज सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.