कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवाऱ्यासाठी म्हाडाची घरे; पवारांनी दिल्या टाटा रुग्णालयाला चाव्या

| Updated on: May 16, 2021 | 1:22 PM

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णावर उपचार होईपर्यंत मुंबईत राहण्याची सोय व्हावी म्हणून राज्य सरकारने म्हाडाला शंभर घरे दिली आहेत. (NCP chief Sharad Pawar hand over 100 MHADA flat keys to Tata Cancer Hospital)

कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवाऱ्यासाठी म्हाडाची घरे; पवारांनी दिल्या टाटा रुग्णालयाला चाव्या
sharad pawar
Follow us on

मुंबई: कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णावर उपचार होईपर्यंत मुंबईत राहण्याची सोय व्हावी म्हणून राज्य सरकारने म्हाडाला शंभर घरे दिली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘म्हाडा’च्या 100 घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज पार पडला. (NCP chief Sharad Pawar hand over 100 MHADA flat keys to Tata Cancer Hospital)

महाविकास आघाडी सरकार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असून याचा शुभारंभ आज पार पडला. यावेळी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.

रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होणार नाही

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज हा कार्यक्रम पार पडला.

300 चौरस फुटांची घरे

300 चौरस फुट असलेले 100 फ्लॅट टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे आव्हाड यांनी सांगितले. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच कारारनामा करण्यात येणार आहे.

पवार काय म्हणाले होते?

शरद पवार यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती. चार दिवसांपूर्वी आव्हाड पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले होते. त्यावेळी पवारांनी या घराचा प्रश्न काढला होता. त्यावर आव्हाड यांनी ट्विटही केलं होतं. , “काल अचानक साहेबांची भेट झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचाराला… कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांना जी घरे द्यायची होती त्याच काय झालं. मी उत्तर दिले कि साहेब घरे तयार आहेत. चाव्या देखील हातात आहेत. फक्त त्या त्यांना द्यायच्या आहेत. मग म्हणाले उशीर कशाला.” शरद पवार यांच्या या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी म्हटलं आपल्या तारखेची वाटत पाहतोय. साहेब म्हणाले ठिक आहे. ह्या आठवड्यामध्ये हा कार्यक्रम करूयात. पहिले त्यांना घरे दिली पाहिजेत.” (NCP chief Sharad Pawar hand over 100 MHADA flat keys to Tata Cancer Hospital)

 

संबंधित बातम्या:

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी द्यायच्या घरांचं काय झालं?, आव्हाड भेटीला येताच शरद पवारांचा पहिला सवाल

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

Maharashtra Coronavirus LIVE Update : एकीकडे मोदीजींकडून महाराष्ट्राचं कौतुक, दुसरीकडे प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं : रुपाली चाकणकर

(NCP chief Sharad Pawar hand over 100 MHADA flat keys to Tata Cancer Hospital)