परमबीर सिंहांनी कटकारस्थान करुन गृहमंत्र्यांना बदनाम केले: नवाब मलिक

मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या पत्रावरून जो वाद निर्माण झाला आहे त्यावर नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. | Nawab Malik

परमबीर सिंहांनी कटकारस्थान करुन गृहमंत्र्यांना बदनाम केले: नवाब मलिक
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना त्यांना भेटल्याचा आरोप करणारे माजी आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी कटकारस्थान करुन महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची चौकशी होईलच व त्यादृष्टीने कारवाई केली जाईल. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही, असा पक्षाने निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. (NCP leader Nawab Malik slams Parambir Singh)

मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या पत्रावरून जो वाद निर्माण झाला आहे त्यावर नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले. परमबीर सिंह यांना 17 मार्चला बदली होणार हे माहित असताना 16 मार्चला काहीतरी प्रश्न विचारुन चॅट पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेंना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचदरम्यान अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना कोरोना झाला. 15 दिवस हॉस्पिटलमध्ये नंतर 27 फेब्रुवारीपर्यंत गृहविलगीकरणात होते. 27 फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असे असताना पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा प्रयत्न होता, असेही नवाब मलिक म्हणाले.

‘परमबीर सिंग यांच्या दिल्लीतील भेटीगाठींची आमच्याकडे माहिती; वेळ येताच एक्सपोज करू’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर प्रतिक्रिया देण्यास नकार देणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता या संपूर्ण प्रकरणावर मोठं विधान केलं आहे. परमबीर सिंग दिल्लीत कुणाला भेटले होते, याची माहिती आमच्याकडे असून वेळ आल्यावर ती उघड केली जाईल, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांचा बोलविता धनी कोणी आहे का? असा सवाल केला जात आहे.

संबंधित बातम्या:

केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी ढगातून पडलेत का; लेटरबॉम्ब प्रकरण विरोधकांवर बुमरँग होईल: संजय राऊत

भास्कर जाधवांच्या ‘राष्ट्रवादी’वासी चिरंजीवांवर ‘मातोश्री’ची कृपा, विक्रांत जाधवांना ZP अध्यक्षपद

मोठी बातमी: NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

(NCP leader Nawab Malik slams Parambir Singh)