समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढाई थांबणार नाही: नवाब मलिक

| Updated on: Jan 03, 2022 | 5:15 PM

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. मात्र, वानखेडे यांची बदली झाली तर त्यांच्याविरोधातील लढाई थांबणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

समीर वानखेडेंची बदली झाली तरी लढाई थांबणार नाही: नवाब मलिक
नवाब मलिक
Follow us on

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. मात्र, वानखेडे यांची बदली झाली तर त्यांच्याविरोधातील लढाई थांबणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. समीर वानखेडे यांचा फर्जीवाडा मी उघड केला होता. त्यांना मुदतवाढ मिळाली नाही हे चांगलं झालं. मी या प्रकरणात पाठपुरावा करणार आहे. त्यांना मुदतवाढ मिळावी म्हणून काही लोक प्रयत्न करत होते. जर त्यांना ही मुदतवाढ मिळाली असती तर त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मी एक्सपोज केलं असतं, असं मलिक यांनी सांगितलं. मात्र, आता वानखेडे यांना मुदतवाढ न मिळाल्याने त्यांच्यासाठी लॉबिंग करणाऱ्यांची नावे सांगणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच वानखेडेंची बदली झाली असली तरी त्यांच्याविरोधातील लढाई सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्र्याची हकालपट्टी करा

यावेळी त्यांनी लखीमपूर हिंसेवरही भाष्य केलं. लखीमपूर प्रकरणात मंत्र्याचा मुलगा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर चार्जशीट फाईल झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्र्यांना वाचवत आहेत. म्हणजे त्यांची पाठराखण केंद्र सरकार करत आहे. अशा मंत्र्याची हकालपट्टी करण्याची गरज आहे. मुलगा हत्येचा कट करतो, तरीही मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही. म्हणजे या कृत्याचीच पाठराखण केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.

मोदींना माफ करणार नाही

मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदींबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यावरही मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींचं ते विधान योग्य नाही. हे सत्य असेल तर देशाची जनता मोदी साहेबांना माफ करणार नाही, असं ते म्हणाले.

वानखेडेंची बदली

दरम्यान, वानखेडे यांची अखेर डीआरआय विभागात बदली करण्यात आली आहे. वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपलाय. त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या डीआरआय अर्थात डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागामध्ये पाठवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

NCB | उभ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढणारे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची अखेर बदली

अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन, ठाण्यात सावित्रीच्या लेकींचा सन्मान

पुण्यात तूर्तास शाळा बंदचा निर्णय नाही, पालकमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर नवी नियमावली, महापौरांकडून स्पष्ट