उद्धव ठाकरे यांच्या हृदयातून प्रेमाचे झरे वाहतात; ठाकरेंच्या स्वभावातील सच्चा माणूसच या नेत्यानं दाखवून दिला…

| Updated on: Jan 26, 2023 | 6:39 PM

उद्धव ठाकरे म्हणजे मानवी मूल्यांचा आदर करणारा नेता आहे. त्याचबरोबर मी आजारी असताना, आणि जगण्याची कोणतीही शक्यता नसताना एका हॉस्पिटलमधून हलवून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ज्या मला हलवण्यात आले.

उद्धव ठाकरे यांच्या हृदयातून प्रेमाचे झरे वाहतात; ठाकरेंच्या स्वभावातील सच्चा माणूसच या नेत्यानं दाखवून दिला...
Follow us on

ठाणेः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज ठाणे दौरा केला आहे. या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांना तुम्ही या दौऱ्यानिमित्त उपस्थित राहिला आहात त्याबद्दल नेमकं काय सांगाल. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा गेल्या 35 वर्षापासून कार्यकर्ता आहे, त्याचबरोबर मागील अडीच वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले आहे.

त्यावेळी मला त्यांच्या स्वभावात एक उदार अंतकरणाचा माणूस दिसला, त्यांच्या हृदयातून वाहणारे प्रेम दिसले म्हणून आज मी त्यांच्या दौऱ्यानिमित्त मी इथे थांबलो आहे असं स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री हे उदार अंतकरणाचे तर आहेतच मात्र त्यांच्या हृदयातून नेहमी प्रेमाचा झरा वाहणार आहे. त्याचबरोबर ते मानवी मूल्यांचा आदर करणारे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्या दौऱ्यानिमित्त मी ठाण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणजे मानवी मूल्यांचा आदर करणारा नेता आहे. त्याचबरोबर मी आजारी असताना, आणि जगण्याची कोणतीही शक्यता नसताना एका हॉस्पिटलमधून हलवून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ज्या मला हलवण्यात आले.

त्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दिग्गज डॉक्टरांची माझ्या फौज उभी केली असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यामध्ये पालकमंत्री उपस्थित राहिले नाहीत. त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उपरोधिकपणे सांगतले की, आज प्रजासत्ताक दिन आहे,

त्यामुळे असे अवघड प्रश्न कशाला विचारता. ज्यांना प्रजासत्ताक महत्वाचा वाटत नाही त्यांना तुम्ही सवाल केल पाहिजे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीबाबत चर्चा झाल्यानंतरही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, ज्या वेळी राजकीय पक्ष युती-आघाडी करतात त्यावेळी छोटे मोठे वाद बाजूला ठेऊन एकत्र आलेले असताता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या टिकेविषयी काय बोलणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.