Explainer: NDA की काँग्रेस? शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेच्या केंद्रस्थानी, चाचपणी की केंद्रातील मोठी खेळी? आताच खलबतं का? काय गोटातील बातमी?

Sharad Pawar NCP- NDA: ऑपरेशन टायगर संपतच नाही तोच ऑपरेशन तुतारीच्या चर्चांनी जोर धरला. शरद पवार यांची राष्ट्रवादी NDA सोबत जाण्याची गोटातील बातमी समोर आली. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीने लागलीच वृत्तही फेटाळले. पण आगीशिवाय धूर निघत नाही अशी मराठीतील म्हण बरंच काही सांगून जाते.

Explainer: NDA की काँग्रेस? शरद पवारांची राष्ट्रवादी चर्चेच्या केंद्रस्थानी, चाचपणी की केंद्रातील मोठी खेळी? आताच खलबतं का? काय गोटातील बातमी?
शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत सत्तेत?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 08, 2026 | 9:46 AM

Sharad Pawar NCP- NDA: साहेबांची राष्ट्रवादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याच्या चर्चांनी कालचा दिवस गाजवला. ऑपरेशन टायगरचा धुरळा खाली बसत नाही तोच ऑपरेशन तुतारीचे पेव फुटले. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या, डीलिमिटेशन बिलासाठी आवश्यक संख्याबळासाठी जुळवाजुळव सुरू असल्याचे दोन राज्यातील घडामोडींवरून समोर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची तृणमूल काँग्रेस फुटली. तर इकडे उद्धव सेनेला शिंदे सेनेने सुरूंग लावला. तरीही अजून मॅजिक फिगर गाठण्यासाठी रसद कमी पडत आहे. या घडामोडीत शरद पवारांची राष्ट्रवादी NDA सोबत घरोबा करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाचे 10 आमदार आणि 8 खासदार आहेत. हा आकडा मॅजिक फिगर गाठण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. त्यातच राष्ट्रवादी NDA सोबत जाण्याची गोटातील बातमी समोर आली. भाजप आणि राष्ट्रवादीने लागलीच वृत्तही फेटाळले. पण आगीशिवाय धूर निघत नाही असे म्हणतात. ही मोठ्या राजकीय उलथापालथीची नांदी तर नाही ना? अशी शंका राजकीय विश्लेषकांना आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us