NEET Paper Leak: मोदींची फास्ट ट्रॅक कोर्टाची घोषणा, कोण आहेत न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगा? महाराष्ट्रात कुठे होणार सुनावणी?
NEET Paper Leak fast track courts: मोदी सरकारने नीट पेपर लिक प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं जाणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याप्रकरणात न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगा यांची विशेष न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती केली आहे. सार्वजनिक परीक्षा कायदा, 2024 अंतर्गत खटल्यावर सुनावणी होईल.

Justice Anu Grover Baliga: नीट प्रश्नपत्रिका फुटीनंतर देश पेटला आहे. गेल्या एक महिन्यांहून अधिका काळापासून कॉक्रोच जनता पार्टीचे जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी NEET Paper Leak fast track courts) फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. दरमान दिल्ली उच्च न्यायालयाने पेपर लीक प्रकरणात अतिजलद न्यायालयाची स्थापना केली आहे. विशेष न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगा यांच्या कोर्टासमोर सुनावणी होईल. तर महाराष्ट्रातही मुंबई उच्च न्यायालयातंर्गत विशेष कोर्ट स्थापन करण्यात आली आहेत.
कोण आहेत अनु ग्रोव्हर बलिगा?
अनु ग्रोव्हर बलिगा या दिल्लीतील न्यायमूर्ती आहेत. दिल्ली हायकोर्टाने त्यांनी NEET-UG 2026 प्रश्नपत्रिका आणि इतर परीक्षा घोटाळा खटल्याची सुनावणी त्यांच्यासमोर होईल. बलिगा यांची विशेष न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दिल्ली न्यायालयीन सेवेच्या (DHJS) अधिकारी आहेत. सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 अंतर्गत फसवणूक आणि अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी जलद सुनावणी घेणे आणि निकाल देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी न्यायमूर्ती म्हणून 10 वर्षांची सेवा बजावली आहे. त्यांनी काही महत्त्वाचे निवाडेही दिले आहेत. 2018 मद्ये एका बलात्कार प्रकरणात त्यांनी आरोपीची निर्दोष सुटका केली होती. आजच्या काळातील स्त्रिया आधुनिक स्वातंत्र्य आणि पारंपापरिक मूल्य यांच्या कात्रीत सापडल्या आहेत. परस्पर संमतीने ठेवलेल्या संबंधातून नंतर बलात्काराचे आरोप करण्यात येतात असे निरीक्षण त्यांनी याप्रकरणात नोंदवले होते.
त्यांनी काही महत्त्वपूर्ण निकालही दिले आहेत. यामध्ये २०१८ मधील एका बलात्कार प्रकरणाचा समावेश आहे, ज्यामध्ये त्यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. या निकालात त्यांनी निरीक्षण नोंदवले होते की, आजच्या काळातील स्त्रिया आधुनिक स्वातंत्र्य आणि पारंपरिक मूल्ये यांच्या कात्रीत सापडल्या आहेत—आणि याच परिस्थितीमुळे परस्पर संमतीने ठेवलेल्या संबंधांतून नंतर बलात्काराचे आरोप उद्भवतात.
महाराष्ट्रात या न्यायमूर्तींची नियुक्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर प्रश्नपत्रिका फुटीविरोधात मोठी पावलं टाकण्यात आली आहेत. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दोन विशेष न्यायालय स्थापन केली. यामध्ये परीक्षांमधील घोटाळ्यांवर सुनावणी होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस व्ही पवार आणि नागपूरमध्ये अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी गुलशन कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या विशेष न्यायालयासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे.