दिवाळी साजरी करताना अभिनेत्रीच्या ड्रेसला आग, फोटो व्हायरल

'जमाई राजा' कार्यक्रमातील प्रमुख अभिनेत्री निया शर्मा (actrees nia sharma dress fire) दिवाळी साजरी करत असताना एका मोठ्या दुर्घटनेतून वाचली.

दिवाळी साजरी करताना अभिनेत्रीच्या ड्रेसला आग, फोटो व्हायरल
| Edited By: | Updated on: Oct 29, 2019 | 9:51 PM

मुंबई : ‘जमाई राजा’ कार्यक्रमातील प्रमुख अभिनेत्री निया शर्मा (actrees nia sharma dress fire) दिवाळी साजरी करत असताना एका मोठ्या दुर्घटनेतून वाचली. दिवाळी साजरी करत असताना अचानक तिच्या ड्रेसला आग (actrees nia sharma dress fire) लागली, अशी माहिती नियाने ईन्स्टाग्राम स्टोरीवरुन दिली. नियाने जळालेल्या ड्रेसचे फोटोही तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केले होते.

निया दिवाळीनिमित्त एका पार्टीमध्ये गेली होती. या दरम्यान नियाने ने सिल्वर लेहंगा घातलेला होता आणि त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. नियाने दिवाळी पार्टीमधील ड्रेसचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

दरम्यान, तातडीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने निया वाचली. आता निया सुरक्षीत आहे. “दिव्यांची ताकद, एका सेकंदात आग लागली, लेहंग्याला अनेक लेअर असल्याने मी वाचली, नाहीतर काही झाले असते”, असं नियाने एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले.

नियाचा दिवाळी पार्टीचा एक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये गायक गुरु रंधावा डान्स करताना दिसत आहे. यावेळी अनेक टीव्ही कार्यक्रमातील दिग्गज मंडळी उपस्थित होते.