AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत मोठी धुसफूस, अजून भाव फुटलेले नाहीत..काय म्हणाले एकनाथ खडसे ?

एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे की महायुतीतील शिंदे सेनेतील हा वाद आणखीनच वाढू शकतो. आगामी काळात यात अस्वस्थेत वाढ होऊ शकते असाही दावा त्यांनी केला.

महायुतीत मोठी धुसफूस, अजून भाव फुटलेले नाहीत..काय म्हणाले एकनाथ खडसे ?
Girish Mahajan and Eknath khadse
| Updated on: Jun 07, 2026 | 8:27 PM
Share

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांपैकी सहा जागांवर बिनविरोध निवडणूका झाल्या असल्यात तरी या निवडणूकीत पैशाचा मोठा बाजार झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत.११ जागांवर देखील महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेत मोठी धूसफूस असल्याचा आरोप केला आहे.

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांची निवडणूक लागल्याने राज्यात पुन्हा राजकारण तापले आहे. त्यातच बंडखोरांमुळे या निवडणूकीत पैशांचा मोठा व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठे विधान केले आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपाचे जळगावचे उमेदवार नंदू महाजन हे निवडून येतील, त्यांची बाजू मजबूत असल्याचे म्हटले आहे. तसेच विधान परिषद निवडणूक हा बाजार आहे, सध्या खरेदी विक्री सुरू आहे. अजून भाव फुटलेले नाहीत. निवडणुकीत जो जास्त पैसे देईल त्याला जास्त मतदान केले जाईल अशी स्थिती आहे असेही आरोप खडसे यांनी केला आहे.

गिरीश महाजन हे संकटमोचक म्हटले जातात. मात्र, नाशिक,जळगावमध्ये विधान परिषदेच्या निवडणूकीत मोठी बंडखोरी झाली. गिरीश महाजन यांना आपल्या प्रभाव क्षेत्रात बंडखोरी रोखता आली नाही. बंडखोरांची समजूत काढता आली नाही अशीही टीका खडसे यांनी केली आहे.  महायुतीत सध्या कुरघोडी सुरू आहेत. गुलाबराव पाटील यांना जळगावची जागा त्यांच्या मुलासाठी हवी होती. ते आग्रही होते, मात्र त्यांना जागा न देता ही जागा नंदू महाजन यांना भाजपाने दिली. त्यामुळे गुलाबराव पाटील आणि शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किशोर पाटील म्हणतात बंडखोरीचा पहिला फटका हा मला बसला यावरून बंडखोरी आणि महायुतीत कुरघोडी सुरू असल्याने दिसते. रेशमा काळे यांनी अजून उमेदवारी मागे घेतलेली नाही, त्यामुळे त्या उमेदवारी मागे घेतात का? त्याची उत्सुकता कायम असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी