“बिग सॅल्यूट टू आवर होम मिनिस्टर अमित शाह जी”, भाजप आमदाराचं खास ट्विट

अमित शाह यांचा शांत स्वभाव आणि संयम आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असं नितेश राणे म्हणाले. (Nitesh Rane Amit Shah)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:40 AM, 27 Jan 2021
"बिग सॅल्यूट टू आवर होम मिनिस्टर अमित शाह जी", भाजप आमदाराचं खास ट्विट
अमित शाह

मुंबई: भाजप आमदार नितेश राणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या आंदोलनावर भाष्य करताना नितेश राणेंनी ‘बिग सॅल्यूट टू आवर होम मिनिस्टर अमित शाहजी’ असं ट्विट केलेय. दिल्लीत शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये 83 पोलीस जखमी झाले तर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. (Nitesh Rane Appreciate Home Minister Amit Shah for calmness and patience)

नितेश राणे काय म्हणाले?

आमदार नितेश राणेंनी ‘बिग सॅल्यूट टू आवर होम मिनिस्टर अमित शाहजी’ असं ट्विट केलेय. काल झालेल्या घटनेत अमित शाह यांच्या एकाही पोलिसानं गोळी झाडली नाही. मॉबकडून पोलिसांवर चाल करण्यात आली तरीदेखील पोलिसांनी गोळीबार केला नाही. अमित शाह यांचा शांत स्वभाव आणि संयम आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असं नितेश राणे म्हणाले.

नितेश राणेंचे ट्विट

दिल्ली हिंसाराचारामध्ये 83 पोलीस जखमी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं आणि राजधानी दिल्ली हादरुन निघाली. काही आंदोलकांनी तर थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. काहींनी पोलिसांवर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या हिसांचारात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांचा आकडा 83 असल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. जखमी पोलिसांमधील 45 जणांना ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आल्याचंही कळतंय.

लाल किल्ल्याच्या भिंतीवरुन पोलिसांच्या उड्या

आंदोलक शेतकऱ्यांनी आज हिंसेच्या सगळ्या सीमा ओलांडल्याचं पाहायला मिलत होतं. लाल किल्ला या देशाच्या अस्मिता केंद्रावर जेव्हा पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार हल्ला चढवला. तेव्हा हातात फक्त काठी असलेल्या पोलिसांनी लाल किल्ल्याच्या एका भिंतीवरुन उड्या मारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जवळपास 30 ते 40 फूट उंच असलेल्या भिंतीवरुन उड्या मारताना अनेक पोलीस जखमी झाले आहेत.

संबंधित बातम्या:

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

Kisan Tractor Rally: दिल्लीत ट्रॅक्टर रॅली दरम्यान पोलीस-शेतकरी भिडले, दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीचार्ज

(Nitesh Rane Appreciate Home Minister Amit Shah for calmness and patience)