AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फडणवीसांच्या गाडीवर पिंपरीत चप्पल फेक, 24 तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल…; नितेश राणे यांचा संतप्त इशारा

देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघतो. त्यांना जागोजागी चप्पलांचा हार घालतो मग चप्पला मोजायचे काम त्यांनी करावं.

फडणवीसांच्या गाडीवर पिंपरीत चप्पल फेक, 24 तास पोलिसांना सुट्टी द्या, मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल…; नितेश राणे यांचा संतप्त इशारा
नितेश राणेImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 06, 2022 | 9:29 PM
Share

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पुण्यात विविध कार्यक्रमांचे उद्घघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राज्यातील अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्तेही पिंपरी-चिंचवडमध्ये काही विकास कामांचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते राज्यात कसे फिरतात ते आम्ही बघू असा इशाराही दिला.

या घटनेवर बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे वागत असतील तर राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात ते आम्ही बघतो. त्यांना जागोजागी चप्पलांचा हार घालतो मग चप्पला मोजायचे काम त्यांनी करावं, यानंतर भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चप्पल फेकल्यानंतर नितेश राणे म्हणाले की, २४ तास पोलिसांना सुट्टी द्या मग बघा आम्ही कुठे कुठे चप्पल घालतो असे म्हणत त्यांनी मुंबईच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बोट ठेवले.

तर हिंदुत्व टिकले नसते

तसेच आपल्याला मुंबई महानगरपालिका निवडणूकीचे युद्ध जिंकायचे असून मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता का गरजेची आहे हे लोकांना समजवून सांगा म्हणत त्यांना मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे तुम्हाला करायचे आहे अशा सूचना कार्यकर्त्याना त्यांनी केल्या. नितेश राणे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करुन बाळासाहेब ठाकरे नसते, भाजपची सत्ता आणि आरएसएस नसती तर हिंदुत्व टिकले नसते.

मलिकांचा राजीनामा का आवश्यक आहे

मुंबईत ज्यावेळी 1993 मध्ये बॉम्बस्फोट झाला त्यावेळचे क्षण कुणाला आठवत असतील तर नवाब मलिकांचा राजीनामा का आवश्यक आहे हे अनेक कळेल हे सांगत त्यांना मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली. नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर त्यांनी जे हातवारे केले त्यावरही राणे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काय हातवारे करत होते. थोडं पोलिसांनी बाजूला ठेवले असते तर आम्हीच कानफटीत मारली असती असे वक्तव्यही मलिकांच्या अटकेवर त्यांना केले.

महाराष्ट्रातील पोलीस हतबल

तसेच त्यांना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करुन बाळासाहेबांनंतर खरी हिंदुहृदयसम्राट ही पदवी कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागेल. महाराष्ट्रातील पोलीस हतबल आहेत त्यामुळे दाऊदबरोबर फिरणाऱ्यांना सलाम ठोकावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मलिक यांना तो न्याय का नाही?

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या अटकेचा प्रश्न उपस्थित करुन त्यांना शरद पवार यांनाच सवाल उपस्थित केला. ते म्हणाले की, मला शरद पवारांना विचारायचे आहे की, अनिल देशमुख यांचा राजिनामा तुम्ही लगेच घेतला मग नवाब मलिक यांना तो न्याय का नाही? अनिल देशमुख हे हिंदु आहे, मराठा आहे म्हणून त्यांच्यावर अन्याय केला का? अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे, नवाब मलिक यांच्यावर तर त्यापेक्षा गंभीर आरोप आहेत असे म्हणून त्यांच्या राजीनाम्यावरही त्यांना राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

आदित्य ठाकरेंची नक्कल

यावेळी मॅवमॅवचा पुन्हा विषय काढून आदित्य ठाकरेंची नक्कलही त्यांनी केली. मेट्रोची पाहणी करताना त्यांना केवळ महिलांसाठी असं लिहिलेल्या डब्ब्यावरुन त्यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली. तर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करत असतानाच महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस पक्षावर टीका करताना उद्धव ठाकरे, सोनिया गांधींसमोर एवढे वाकले आहेत की पाठ आणि मानेला पट्टा लागला आहे अशी टीकाही त्यांना केली. यावेळी दिशा सालीयनच्या मृत्यूविषयीही बोलत त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला. आणि शिवसेनेच्या राजकारणाविषयी बोलताना त्यांना शिवसेनेलाच आव्हान दिले आहे की, बाळासाहेबांची शिवसेना ही मैदानात लढायची, मी आजही आव्हान करतो की हिंम्मत असेल तर या मैदानात आणि लढा.

संबंधित बातम्या

नारायण राणेंना BMC ची कारणे दाखवा नोटीस,अधिश बंगला प्रकरणी 7 दिवसांत खुलासा मागवला

अजितदादा सहभाग घेऊन जे चांगले चित्र उभं केलं, त्यावर पूर्णपणे पाणी फिरलं, प्रविण दरेकर असं का म्हणाले?

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील 800 कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, नाना पटोलेंची मागणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.