AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टेमवेळी ‘ही’ व्यक्ती उपस्थित, नितेश राणेंनी शेअर केला Video, म्हणाले बेबी पेंग्विन….

रुपकुमार शाह यांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टवेळी गडबड झाल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या पोस्टमॉर्टेमवेळी 'ही' व्यक्ती उपस्थित, नितेश राणेंनी शेअर केला Video, म्हणाले बेबी पेंग्विन....
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 02, 2023 | 9:32 AM
Share

मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) मृत्यू प्रकरण आता आणखीच तापण्याची चिन्ह आहेत. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नुकताच यासंदर्भात एक व्हिडिओ (Video) शेअर केलाय. सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला नेला जात असतानाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केलाय. यात तो मृतदेह घेऊन जाणारे रुपकुमार शाह दिसत असल्याचा दावाही त्यांनी केलाय.

सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या झाली असावी, असा दावा पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थिती रुपकुमार शाह यांनी केलाय. कारण मृतदेहावर बऱ्याच जखमा होत्या, असेही शाह यांनी म्हटले आहे. रुपकुमार शाह हे पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थित होते,हे दर्शवण्यासाठी नितेश राणेंनी नुकतंच एक ट्विट केलंय.

नितेश राणेंचं ट्विट काय?

शवागृहात सेवक म्हणून काम करणाऱ्या रुपकुमार शहा यांनी सुशांतची हत्याच होती असा दावा केलाय. रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहात कर्तव्यास होते, हे सांगण्यासाठी नितेश राणेंनी ट्विट केलंय. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल आणि आता बेबी पेंग्विन दूर नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.

शाह यांना विशेष सुरक्षा

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रूपकुमार शाह यांना प्रमुख साक्षीदार मानलं जातंय. पोस्टमॉर्टेम अहवालात राजकीय दबावतंत्र वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांच्या वतीने करण्यात येतोय. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी कऱण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तर रुपकुमार शाह यांना विशेष सुरक्षाही देण्यात आली आहे.

  • 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या निधनाचे वृत्त समोर आली होते. – पोलिसांना संशयास्पद स्थितीत त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता.
  •  सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, तसेच यामागे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा हात असल्याचंही म्हटलं जात होतं.
  • अनेक अंगांनी तपास करण्यात आला. अखेरीस सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या असल्याचे अहवालात म्हटले गेले.
  • मात्र रुपकुमार शाह यांनी पोस्टमॉर्टेम रिपोर्टवेळी गडबड झाल्याचा दावा केल्यानंतर या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल