नितेश राणेंकडून रियाझ भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबतचे फोटो प्रसिद्ध, नवाब मलिकांना सवाल

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. रियाझ भाटीवरुन नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

नितेश राणेंकडून रियाझ भाटीचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसोबतचे फोटो प्रसिद्ध, नवाब मलिकांना सवाल
नितेश राणे यांचं ट्विट
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 11:51 AM

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. रियाझ भाटीवरुन नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. नितेश राणे यांनी नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत ‘नवाबभाई कहते है ‘रीयाझ भाटी दाऊद का आदमी है’ या वाक्यासोबत रियाझ भाटीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचे जुने फोटो ट्विट केले आहेत.

नितेश राणे यांचं ट्विट

रियाझ भाटीचे जुने फोटो ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जुने फोटो नितेश राणे यांनी ट्विट केले आहेत. नितेश राणे यांनी नवाब मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

आमचा तुम्हाला सवाल आहे की रियाझ भाटी कोण आहे. 29 ऑक्टोबरला रियाझ भाटी बनावट पासपोर्ट सोबत सहार विमानतळावर पकडला गेला. दाऊद इब्राहिम संबंधाच्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. रियाझ भाटी सर्व कार्यक्रमात तुमच्या सोबत का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करायचा नाही. त्यांच्या कार्यक्रमात जायचं असल्यास तपासणी केल्याशिवाय परवानगी मिळत नाही. रियाझ भाटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो काढले. रियाझ भाटीसोबत तुम्ही वसुलीचं काम केलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

इतर बातम्या:

इतर बातम्या:

मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक

VIDEO: रियाझ भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल

 

Nitesh Rane tweet the images of Riyaz Bhati with Uddhav Thackeray and Sharad Pawar gave answer to Nawab Malik