AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेच्या तरण तलावच्या खासगीकरणाचा घाट, नितेश राणे यांची चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्रं

महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या अंतर्गत मुलुंड क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल चालविले जाते. या दोन्ही संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. (nitesh rane)

महापालिकेच्या तरण तलावच्या खासगीकरणाचा घाट, नितेश राणे यांची चौकशीची मागणी; मुख्यमंत्र्यांना पत्रं
...तर भाजप कार्यकर्त्याशी गाठ!
| Edited By: | Updated on: Sep 03, 2021 | 10:25 AM
Share

मुंबई: महापालिकेच्या बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या अंतर्गत मुलुंड क्रीडा संकुल आणि अंधेरीतील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल चालविले जाते. या दोन्ही संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोध केला आहे. राणे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं असून या प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. (nitesh rane writes to cm uddhav thackeray over bmc’s swimming pool privatization)

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. ललित कला प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता राहावी म्हणून यावर महापालीकेचे नियंत्रण असावे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाटले होते. म्हणून त्यांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज करून ठेवली. यात सदस्य म्हणून कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले. यामागे बाळासाहेबाचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता. परंतु, आता मात्र तसे राहिले नाही,  असं राणे यांनी सांगितलं.

इंटरेस्टशिवाय खासगीकरण शक्य नाही

या प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देवेंद्रकुमार जैन नियुक्त झाल्या झाल्याच स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्टच्या खासगीकरणाचा घाट घातला जातोय. विशेष महत्वाची बाब म्हणजे देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही. जैन हे कुणाच्या निर्देशावरून सामान्य मुंबईकरांच्या हक्काचा जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्ट विकायला निघाले आहेत आणि ते कुणाच्या घशात घालायचे आहेत हेही अगोदरच ठरले असल्याची चर्चा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

एक हजार लोक बेकार होणार

ललित कला प्रतिष्ठाणकडून मागवण्यात आलेले अभिरुची स्वारस्य अर्ज फक्त दिखावा आहे. एकदा खासगीकरण झाले की यात काम करणाऱ्या 1000 हून अधिक कामगारांना उद्ध्वस्त केले जाणार हे स्पष्ट आहे. त्यातील निम्मे लोक हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत. मुळात या दोन्ही संकुलातून मिळणारा पैसा प्रतिष्ठानच्या तिजोरीत जमा होतो. तरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम महापालिकेच्या निधीतून होते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रतिष्ठानकडे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तर रस्त्यावर उतरू

यावेळी नितेश राणे यांनी काही सवालही केले आहेत. नफ्यात चालणाऱ्या तरण तलावाचे खासगीकरणच कशासाठी? कुणासाठी? या जलतरण तलावाचे पाणी नेमकं कुठं मुरतंय? हा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व प्रकाराची आपण विशेष समिती नेमून महापौर किशोरी पेडणेकर व त्यांचे ओएसडी जैन यांची चौकशी करावी. हे खासगीकरण थांबवावे. नाहीत आम्ही प्रतिष्ठानचे 100 कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.

बाळासाहेबांनी काळाची पावलं ओळखली होती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच सामान्य मराठी माणूस होता. बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती व त्यांनी येणाऱ्या काळाची पावलं ओळखली होती. ही मुंबई फक्त धनदांडग्यांची न राहता येथील सामान्य मुंबईकरांनाही खेळ मैदान, जलतरण तलाव, उद्यान पाहायला मिळावीत, त्याचा लाभ घेता यावा, तिथे आपले कौशल्य विकसित करता यावीत यासाठी त्यांनी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानची स्थापना केली होती. पण आता खुद स्थापन केलेल्या प्रतिष्ठानालाच भ्रष्टाचाराचे केंद्र करण्यात येतंय असा संताप सामान्य नागरिक व्यक्त करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. (nitesh rane writes to cm uddhav thackeray over bmc’s swimming pool privatization)

संबंधित बातम्या:

सगळंच पुन्हा बंद करण्याची वेळ आणू नका, दादांनी दरडावलं, शाळा कधी सुरु होणार? दादा म्हणतात..

राज ठाकरेंच्या पुणे प्लॅनला चेकमेट करण्यासाठी शिवसेना मैदानात, मनसेतून आलेल्या नेत्याला पुण्याची जबाबदारी

पहाटे पाच वाजता पोलिसांची शेतात धाड, साडेआठ लाखांची 40 हजार लिटर हातभट्टी दारु नष्ट

(nitesh rane writes to cm uddhav thackeray over bmc’s swimming pool privatization)

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?