बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या संस्था तोट्यात कशा गेल्या? नितेश राणेंचा बीएमसीला सवाल

| Updated on: Nov 03, 2021 | 12:50 PM

भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात नितेश राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सुरू झालेल्या बृन्हमुंबई क्रिडा आणि ललित प्रतिष्ठान या संस्थांच्या खासगीकरणाला विरोध केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या संस्था तोट्यात कशा गेल्या? नितेश राणेंचा बीएमसीला सवाल
नितेश राणे, आमदार, भाजप
Follow us on

मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहिलं आहे. पत्रात नितेश राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सुरू झालेल्या बृन्हमुंबई क्रिडा आणि ललित प्रतिष्ठान या संस्थांच्या खासगीकरणाला विरोध केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून या संस्था नियमfत आणि चांगलं काम करत होत्या.मग अचानक तोट्यात कशा गेल्या ?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

फायद्यात असणाऱ्या संस्था तोट्यात कशा गेल्या?

नितेश राणे यांनी बृन्हमुंबई क्रिडा आणि ललित प्रतिष्ठान या संस्था नियमित आणि चांगलं काम करत होत्या, असं म्हटलंय. सर्व संस्था तोट्यात चालत असून खासगीकरणाशिवाय पर्याय नाही हा दावा कोणत्या कॅान्ट्रॅक्टर्सच्या फायद्यासाठी ?, असा सवाल राणे यांनी केला आहे.

इतकी वर्ष संस्थेच्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवींच नेमकं काय झाल ? कुठे खर्च झाल्या याचा हिशोब द्या, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून खाजगी कॅान्ट्रॅक्टर्स भरती करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत.

कोरोना काळात उत्पन्नाचे स्त्रोत घटले

एप्रिल 2020 पासून कोरोनाच्या संकटामध्ये प्रतिष्ठनची दोन्ही क्रीडा संकुलातील सर्वच सुविधा पूर्णपणे गेली एक वर्ष बंद झालेली होती. त्यामुळे दोन्ही क्रीडा संकुलातील उत्पन्नाचे स्त्रोत संपूर्णपणे घटले आहेत. याकालावधी दरम्यान दोन्ही संकुलातील आवश्यक जागाही कोव्हिड-19 चे साहित्य ठेवण्याकरिता आणि मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आवश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्य, असं नितेश राणे म्हणाले.

एप्रिल 2020 पासून आजपर्यंत प्रतिष्ठानाच्या कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट दहा हजार रुपये मानधन वेतन म्हणून दिले जात आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांचा भविष्यनिर्वाहनिधी देखील एप्रिल 2020 पासून पूर्णपणे भरण्यात आलेला नाही व या कालावधीत सेवानिवृत झालेल्या कर्मचारी व अधिकारी यांचे सेवानिवृत्ती नंतरचे देयक अनेकांना देण्यात आलेले नाही आणि ज्यांना देयक दिल्या जात आहेत त्यांना टप्प्याटप्प्याने दिल्या जात आहेत याकडेही नितेश राणे यांनी लक्ष वेधलं आहे.

इतर बातम्या:

…अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु, माजी कृषीमंत्री अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेमकं प्रकरण काय?

Video : कोरोनाची लस घेतलीही नाही आणि घेणारही नाही, इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

Nitesh Rane wrote letter to BMC Commissioner for raised questions about two institutions privatizations