…अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु, माजी कृषीमंत्री अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेमकं प्रकरण काय?

अधिकारी मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले

...अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु, माजी कृषीमंत्री अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेमकं प्रकरण काय?
अनिल बोंडे


अमरावती: माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी एका आंदोलनात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील रोजगार हमी योजनेतील कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळत आहे.  निंबुरकर मृत्यू प्रकरणात तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू, अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केले.

नेमकं प्रकरण काय?

कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी चेतन जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाहीतर गटविकास अधिकाऱ्याला फटके मारू, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केले आहे. प्रमोद निंबुरकर यांच्या पत्नीला प्रशासनानं काम द्यावं, असं अनिल बोंडे म्हणाले. प्रशासनाच्या चुकीमुळं निंबुरकर यांचा जीव गेलाय,असं बोंडे म्हणाले. तिवसा मतदारसंघाच्या आमदार आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी निंबुरकर यांच्या पत्नीचं सांत्वन करण्यासाठी जायला हवं होतं. मात्र, ते जमत नसेल तर किमान त्यांच्या पत्नीला काम द्यावं, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.

अनिल बोंडे यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर एका आंदोलनात हे वक्तव्य केलं आहे,त्यावर विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या वक्तव्याविरोधात व बीडीओ जाधव यांच्या समर्थनार्थ तिवसा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यानी अमरावती जिल्हाधिकाऱ्याना निवेदन देत अनिल बोंडे यांचा निषेध केला आहे. तिवस्याचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांना कार्यालयात येऊन मारण्याची धमकी देणे ही बाब असंवैधानिक असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले आहे

अधिकाऱ्यांना धमकी खपवून घेणार नाही, यशोमती ठाकूर यांची भूमिका

अनिल बोंडे यांचं वक्तव्य चुकीचं आहे. ते त्यांच्या पक्षाची संस्कृती काय आहे ते दाखवत आहेत. मागासवर्गीय समाजाचा अधिकारी तिथे आहेय. बोंडे अरेरावी करत असतील तर आम्ही तसं होऊ देणार नाही. या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे. अनिल बोंडे यांनी सांभाळून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. या प्रकरणातील जो अधिकारी होता तो सस्पेंड झाला होता, तो अरेरावीची भाषा करत होता. त्यांचं अपघाती निधन झालं ते दुर्दैवी आहे. मात्र, अधिकाऱ्यांना धमकी देणं खपवून घेतलं जाणार नाही, असं अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

इतर बातम्या:

Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!

T20 World Cup: केवळ अफगाणिस्तानला हरवून चालणार नाही, सेमीफायनल खेळण्यासाठी टीम इंडिया इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून

BJP Leader Anil Bonde controversial statement giving threat to BDO said he will beat officer

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI