T20 World Cup: केवळ अफगाणिस्तानला हरवून चालणार नाही, सेमीफायनल खेळण्यासाठी टीम इंडिया इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून

ICC T20 विश्वचषक-2021 ला पहिला सेमीफायनलिस्ट मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या ग्रुप-2 सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा पराभव करून अंतिम-4 मध्ये प्रवेश केला आणि या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला.

T20 World Cup: केवळ अफगाणिस्तानला हरवून चालणार नाही, सेमीफायनल खेळण्यासाठी टीम इंडिया इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून
Team India
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 11:04 AM

मुंबई : ICC T20 विश्वचषक-2021 ला पहिला सेमीफायनलिस्ट मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या ग्रुप-2 सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा पराभव करून अंतिम-4 मध्ये प्रवेश केला आणि या विश्वचषकात उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला. ग्रुप-2 मधून अजून एक संघ पात्र ठरणार आहे. या गटात भारताचाही समावेश आहे. या गटातील उर्वरित संघांच्या पात्रतेची स्थिती काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (T20 world cup 2021 group 2 sceanario : Team India depends on performance of other teams to reach semifinals)

पाकिस्ताननंतर न्यूझीलंडची ग्रुप-2 मधील स्थिती चांगली आहे. बाद फेरी गाठण्याची हा संघ सर्वात मोठा दावेदार आहे. त्यांनी उर्वरित सर्व सामने जिंकले तर हा संघ उपांत्य फेरीसाठी सहज पात्र ठरेल. परंतु त्यांना अफगाणिस्तानने हरवल्यास आणि त्यानंतर किवी संघाने स्कॉटलंड आणि नामिबियावर मात केल्यास त्यांचे सहा गुण होतील. तसेच, भारताने उर्वरित तीन सामने जिंकल्यास दोन्ही संघांचे प्रत्येकी सहा गुण होतील. अशा स्थितीत सेमीफायनलची गाडी नेट रन रेटवर अडकणार आहे. आतापर्यंत अफगाणिस्तानचा नेट रनरेट भारत आणि न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे. भारताची निव्वळ धावगती (नेट रनरेट) -1.609 आणि न्यूझीलंडची निव्वळ धावगती 0.765 अशी आहे. न्यूझीलंडचा संघ स्कॉटलंड, नामिबिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध सामने खेळणार आहे.

अफगाणिस्तानही सेमीफायनलचा दावेदार

अफगाणिस्तानने स्कॉटलंड आणि नामिबियाला हरवून आपली स्थिती मजबूत केली आहे. या संघाने या दोन्ही संघांना मोठ्या फरकाने पराभूत केले आणि यामुळे त्यांची निव्वळ धावगती खूप मजबूत स्थितीत आहे. या संघाला 7 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी सामना करायचा आहे. जरी अफगाणिस्तान भारताकडून हरला तरी काही फरक पडणार नाही कारण त्यांच्या निव्वळ धावगतीवर याचा परिणाम होणार नाही, पण या संघाला न्यूझीलंडचा पराभव करावा लागेल. मात्र, अफगाणिस्तानने भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना पराभूत केल्यास ते थेट सेमीफायनलमध्ये पोहोचतील.

भारत इतरांच्या कामगिरीवर अवलंबून

भारत अजूनही पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. पहिल्या सामन्यात भारताला पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने पराभूत केले होते. आज त्यांना अफगाणिस्तानचा सामना करावा लागणार आहे. भारताला अजून तीन सामने खेळायचे आहेत. भारताने तिन्ही सामने जिंकले तरी त्यांना इतर संघांवर अवलंबून राहावे लागेल कारण न्यूझीलंडनेही तिन्ही सामने जिंकले तर भारतीय संघ आपोआप बाद होईल. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला हरवले आणि त्यानंतर भारताने त्यांचे सर्व सामने जिंकले तर भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व संघ सहा गुणांवर असतील आणि त्यानंतर सर्व काही निव्वळ धावगती निश्चित करेल.

नामिबिया आणि स्कॉटलंडही रेसमध्ये

नामिबिया आणि स्कॉटलंडचे प्रत्येकी दोन पराभव झाले आहेत. या दोन्ही संघांनी त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकले आणि नंतर निव्वळ धावगती सुधारून पात्रता मिळवली तरच ते पात्र ठरू शकतात. सध्या स्कॉटलंडचा नेट रन रेट -3.562 आणि नामिबियाचा नेट रन रेट -1.599 आहे. त्यांना धावगती सुधारण्यासाठी उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

इतर बातम्या

T20 World Cup India vs Afghanistan live streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना

T20 World Cup 2021: आधी सामन्यात पराभूत केल्यानंतर आता विराटच्या मोठ्या रेकॉर्डलाही बाबरची गवासणी, नामिबियाविरुद्ध विक्रमाची नोंद

2007 वर्ल्ड कपमध्येही भारताने 2 चुका केल्या, त्याच चुका आताही, रोहितला ओपनिंग करु न दिल्याने वीरेंद्र सेहवाग भडकला

(T20 world cup 2021 group 2 sceanario : Team India depends on performance of other teams to reach semifinals)

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.