2007 वर्ल्ड कपमध्येही भारताने 2 चुका केल्या, त्याच चुका आताही, रोहितला ओपनिंग करु न दिल्याने वीरेंद्र सेहवाग भडकला

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माला सलामीला न पाठवण्यावरुन विराट आणि संघ व्यवस्थापनावर सडकून टीका केली आहे. तसंच यावेळी त्याने 2007 च्या वर्ल्डकप इतिहासाचे दाखलेही दिले आहेत.

2007 वर्ल्ड कपमध्येही भारताने 2 चुका केल्या, त्याच चुका आताही, रोहितला ओपनिंग करु न दिल्याने वीरेंद्र सेहवाग भडकला
रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 9:07 AM

मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्यांदा पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवला आणि नंतर परंपरेप्रमाणे न्यूझीलंडने भारताला आस्मान दाखवलं. या दोन्ही सामन्यांमध्ये संघाच्या प्लेईंग 11 बद्दल बरीच चर्चा झाली. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात असा बदल पाहायला मिळाला, ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. तोच सध्या चर्चेचा हॉट पॉईंट आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीने रोहित शर्माला ओपनिंग न करता नंबर 3 ला खेळायला पाठविले. सलामीची जबाबदारी केएल राहुल आणि इशान किशन यांच्यावर देण्यात आली होती. याच सामन्यात भारताच्या बॅटिंगची दाणादाण उडाली. यानंतर बरंच विचारमंथन झालं. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माला सलामीला न पाठवण्यावरुन विराट आणि संघ व्यवस्थापनावर सडकून टीका केली आहे. तसंच यावेळी त्याने 2007 च्या वर्ल्डकप इतिहासाचे दाखलेही दिले आहेत.

2007 च्या वर्ल्डकप इतिहासाचे दाखले

2007 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवण्यात आले होते. परंतु सचिनने त्याच्या कारकीर्दीत बहुतांश वेळा ओपनिंगलाच बॅटिंग केल्याने वर्ल्डकप खेळलेली चाल अयशस्वी ठरली. Cricbuzz शी बोलताना सेहवाग म्हणाला, “2007 वर्ल्ड कपमध्ये आम्ही दोन चुका केल्या. प्रथम, जेव्हा आम्ही चांगला पाठलाग करत होतो आणि सलग 17 सामने जिंकले होते, पण जेव्हा विश्वचषक आला तेव्हा आमचे प्रशिक्षक म्हणाले की आम्हाला फलंदाजीचा सराव आवश्यक आहे. मी म्हणालो आम्हाला दोन सामने जिंकू द्या आणि त्यानंतर आम्हाला फलंदाजीचा सराव करण्यासाठी सहा सामने असतील, पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं.

सचिनला ओपनिंगमधून काढून टाकण्याची दुसरी चूक

सेहवाग म्हणाला, “दुसरी चूक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही सलामीची जोडी चांगली कामगिरी करत होती, तेव्हा ती तोडण्याची काय गरज होती?. सचिनने मधल्या फळीत फलंदाजी केली तर मधली फळी आणखी भक्कम होईल आणि कंट्रोल राहिल, असं म्हटलं गेलं. राहुल द्रविड, युवराज सिंग आणि एमएस धोनीमुळे मधली फळी भक्कमच होती, तुम्हाला चौथ्याची गरज का पडली? सचिनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि काय झाले ते आपण सगळ्यांनी पाहिलं. जेव्हा संघ डावपेच बदलतो तेव्हा संघाकडून काय चुका होतात, हे ही अनेक वेळा दिसतं. सेट असलेलं गणित बदलण्याची गरज का भासावी?, असे एक ना अनेक सवाल वीरेंद्र सेहवागने उपस्थित केले.

हे ही वाचा :

T20 World Cup 2021: रबाडा-नॉर्खियाच्या माऱ्यासमोर बांग्लादेश गारद, दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून विजय

विराटच्या मुलीला धमकावणारा होणार गजाआड, दिल्ली पोलिसांनी कसली कंबर

Non Stop LIVE Update
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.