AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: देशभरातील गैरभाजपा मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकवटणार, पवार-ठाकरे घेणार पुढाकार; संजय राऊतांची मोठी माहिती

Sanjay Raut: येणाऱ्या काळात देशभरातील गैरभाजपा शासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री मुंबईत येणार आहेत. महागाईपासून ते बेरोजगारीपर्यंत आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. खुद्द शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्याबाबतची आज माहिती दिली आहे.

Sanjay Raut: देशभरातील गैरभाजपा मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकवटणार, पवार-ठाकरे घेणार पुढाकार; संजय राऊतांची मोठी माहिती
संजय राऊतImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 17, 2022 | 2:21 PM
Share

मुंबई: येणाऱ्या काळात देशभरातील गैरभाजपा शासित राज्यातील सर्व मुख्यमंत्री मुंबईत येणार आहेत. महागाईपासून ते बेरोजगारीपर्यंत आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. खुद्द शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्याबाबतची आज माहिती दिली आहे. मुंबईत विरोधकांची एक बैठक होणार आहे. या बैठकीची आम्ही तयारी सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार ही बैठक होत आहे. स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar)  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) हे या बैठकीसाठी पुढाकार घेणार आहेत. या बैठकीला सर्व विरोधक आणि गैरभाजपा राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महागाईपासून बेरोजगारी पर्यंतच्या सर्व विषयावर चर्चा होणार असून त्यातून निष्कर्ष काढण्यात येणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.

शांत असलेल्या महाराष्ट्रात काल काही लोकांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी सर्व परिस्थिती हाताळली. त्यांनी काहीच होऊ दिलं नाही. यापुढे होऊ देणार नाही. राम आणि हनुमानाच्या नावाने दंगल घडवण्याचा त्यांचा हेतू होता. नवे हिंदू ओवैसी ते करत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी जातीय तणाव निवळण्यासाठी आवाहन करायला हवं. पंतप्रधानांचं या वातावरणाला समर्थन आहे का? नसेल तर समोर येऊन मन की बात सांगा, असं आवाहन राऊत यांनी केलं.

हिंदू-मुस्लिम दंगलीचे प्रयत्न सुरू

यावेळी त्यांनी दिल्लीतील हिंसेवरूनही प्रतिक्रिया व्यक्त केली. राजकीय फायद्यासाठी, निवडणूक जिंकण्यासाठी देशातील वातावरण खराब केलं जात आहे. ते देशासाठी योग्य नाही. काल दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला झाला. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. शांततेत उत्सव साजरे केले जात होते. मिरवणूक काढण्याचा हक्क सर्वांना आहे. पण कालचे हल्ले प्रायोजित आहेत. राजकीय स्पॉन्सर्ड हल्ले आहेत. हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहे. भारत-पाक चालणार नाही, अयोध्या चालणार नाही, सर्जिकल स्ट्राईक चालणार नाही, त्यामुळेच हा प्रकार सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

जेम्स लेन प्रकरणावर बोलण्यास नकार

यावेळी त्यांनी जेम्स लेन प्रकरणावर बोलण्यास नकार दिला. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही. जेम्स लेनने काय लिहिलं ते माहीत नाही. मी त्यावर बोलणार नाही. पुरंदरे हे त्यांच्या वतीने खुलास करण्यासाठी जिवित नाही. बाजू मांडण्यासाठी जिवित नाही त्यांच्याबाबत बोलणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut: महाराष्ट्रातील नवे हिंदू ओवैसी कोण? हे भोंग्यावरूनच स्पष्ट; राऊतांचा राज ठाकरेंवर नाव न घेता हल्ला

Raj Thackeray : भोंगे ते अयोध्यावारी, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे

James lane Controversy: बाबासाहेबांशी कधीही एका शब्दाने सुद्धा बोललो नाही, पुरंदरे वादावर जेम्स लेनचा खुलासा

Follow Us
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
Gokul Election : गोकुळ अध्यक्ष निवडीत महायुतीचा खो? 12 संचालक बेळगावात - सुत्र
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
Abhijit Vanjari : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारींनी सांगितलं युक्तीचं गणित
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
CM Devendra Fadnavis : मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं काय घडलं?
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
Marathwada MLC Election Result : Pratapsinh Patil : मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटील यांचा दणदणीत विजय