AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलिसांचा ‘बॉस’ ठरला, परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

परमबीर सिंह हे यापूर्वीही आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना डावलून संजय बर्वे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली होती.

मुंबई पोलिसांचा 'बॉस' ठरला, परमबीर सिंह मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 29, 2020 | 12:38 PM
Share

मुंबई : देशातील अत्यंत महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं पद असलेल्या मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची वर्णी लागली आहे. पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या दहा ते बारा जणांना मागे टाकत परमबीर सिंह यांची निवड झाली आहे. ठाकरे सरकारने परिपत्रक काढून ही घोषणा केली. (Param Bir Singh Mumbai Police Commissioner)

संजय बर्वे मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागलं होतं. फेब्रुवारीच्या अखेरच्या दिवशी या सस्पेन्सवर पडदा पडला.

परमबीर सिंह हे यापूर्वीही मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांना डावलून संजय बर्वे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली होती. परमबीर सिंह यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तही होते. सध्या परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत.

कोण आहेत परम बीर सिंह? • परम बीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. • त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागात अनेक पदांवर काम केलं. • लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे महासंचालक पद सांभाळलं. • ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. • परम बीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते.

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आज (29 फेब्रुवारी) निवृत्त झाले. खरं तर त्यांना केवळ एक वर्षाचा कालावधी मिळाला होता. मात्र, आधी लोकसभा निवडणुका आणि नंतर विधानसभा निवडणुकांमुळे त्यांना दोनदा मुदतवाढ मिळाली. त्यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना सहा महिने अधिक मिळाले.

संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचा पोलिस आयुक्त कोण होणार याची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. या पदासाठी परमबीर सिंह यांच्याशिवाय राज्याच्या टेक्निकल विभागाचे प्रमुख हेमंत नगराळे, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, पुण्याचे पोलिस आयुक्त के वेंकटेशम, सध्या केंद्रात प्रति नियुक्तीवर असलेले सदानंद दाते यासारख्या दहा-बारा अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती.

परमबीर सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार बिपिन के. सिंग (अपर पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात आला आहे.

Param Bir Singh Mumbai Police Commissioner

Follow Us
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?