AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय घडामोडींना वेग, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांमध्ये होऊ शकते महत्वाची बैठक

आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांमध्ये बैठक होऊ शकते. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या बैठकीला महत्व आहे. काही जागांवर तिढा आहे.

राजकीय घडामोडींना वेग, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांमध्ये होऊ शकते महत्वाची बैठक
Mahayuti
| Updated on: Sep 30, 2026 | 9:50 AM
Share

विनायक डावरुंग, प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यात आज महत्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आहे. विधान परिषदेत तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या जागा आहेत. त्या निवडणुकी संदर्भात ही बैठक होणार आहे. भाजप प्रमाणेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा या जागांवर दावा सांगितला जातोय. काल समन्वय समितीची बैठक झाली. त्यात प्राथमिक चर्चा झाली. आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये होणारी बैठक महत्वाची आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूरमध्ये पदवीधर तर अमरावती आणि पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या जागा आहेत. विधान परिषदेच्या कुठल्या जागा कोणाला मिळणार, कोण कुठून लढवणार त्याचा निर्णय आजच्या बैठकीत होऊ शकतो. विधान परिषदेच्या जागांच्या संदर्भात निर्णय अपेक्षित आहे.

मुख्य तिढा पुण्याच्या जागेचा असू शकतो. पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागा आहेत. पुण्यातील शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष या जागेवर दावा सांगतायत. पुणे शिक्षक मतदार संघानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदार संघाचीही मागणी करण्यात आली आहे. पुणे पदवीधर मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊसाहेब आंधळकर इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे पक्षाने मला डावलू नये

भाऊसाहेब आंधळकरांनी यापूर्वी शिवसेनेकडून बार्शी विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता पुणे पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. मी पुणे पदवीधर मधून मोठी बांधणी केलीय. त्यामुळे पक्षाने मला डावलू नये अशीही मागणी भाऊसाहेब आंधळकर यांनी केलीय.

भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने येण्याची शक्यता

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देखील या दोन्ही मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या जागा परंपरागत भाजपाच्या आहेत, दोन्ही जागांवर आमचा दावा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार सांघाच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी